महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिर्डीत धुमस्टाईलने चोरी करणाऱ्या चोरांना अटक, १० किलो सोने जप्त

शिर्डीत धुमस्टाईलने चोरी करणाऱ्या सोनसाखळी चोरांविरोधात पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे.

By

Published : Mar 17, 2019, 5:20 PM IST

धुमस्टाईलने चोरी करणाऱ्या चोरांना अटक

अहमदनगर- शिर्डीत धुमस्टाईलने चोरी करणाऱ्या सोनसाखळी चोरांनी धुमाकुळ घातला होता. या चोरांविरोधात पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. पोलिसांनी ४ जणांना अटक करुन, चोरीला गेलेले १० किलो सोने हस्तगत केले आहे.

मोटारसायकलवर येऊन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरुन धुम ठोकणाऱ्या चोरांनी शिर्डीत गेल्या काही दिवसापासून धुमाकूळ घातला होता. या सोनसाखळी चोरांमुळे भाविक आणि शिर्डीकरांमध्ये भीतीचे वातावरणात निर्माण झाले होते. त्यामुळे या चोरांचा बंदोबस्त करण्याचे आव्हान पोलिसांपुढे होते.

अखेर ४ चोरांना गजाआड करण्यात शिर्डी पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून १० किलो २०० ग्रँम वजनाचे सोन्याच्या दागिण्यांसह १ मोटारसायकल असा एकूण ३ लाख ८० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या आरोपींकडून इतरही अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी सांगितले.

धुमस्टाईलने चोरी करणाऱ्या चोरांना अटक

शिर्डी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी किरण छगन सोनवणे (रा. दत्तनगर कोपरगाव), नवनाथ साहेबराव गौर्डे (रा.पोहेगाव), मनोज चंद्रकांत बडोदेकर (रा. बिरोबा रोड, शिर्डी) हे दरोड्याच्या उद्देशाने शिर्डीत येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर सापळा लावून पोलिसांनी मोठ्या शिताफीने या आरोपींना अटक केली. दरम्यान, या आरोपींचे २ साथीदार फरार असून, पोलिसांनी सदर आरोपींविरोधात गुन्हा दाखल केली आहे. या आरोपींची विचारपूस केली असता, त्यांनी वेगवेगळ्या गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १८ मार्च २०१९ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details