महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विरोधातील आवाज दडपणारे हे दळभद्री सरकार - अजित पवार

आत्ताचे सरकार हे दळभद्री सरकार असल्याचे सांगत शेतकरी विरोधी आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी येथे केली. आंदोलन करणाऱ्यांना पोलीस अटक करत आहे. मात्र, ही मोगलाई नाही असा घणाघातही त्यांनी केला.

कर्जत येथील कार्यक्रमात बोलताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार

By

Published : Sep 24, 2019, 11:39 AM IST

अहमदनगर - आत्ताचे सरकार हे दळभद्री सरकार असल्याचे सांगत शेतकरी विरोधी आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी येथे केली. आंदोलन करणाऱ्यांना पोलीस अटक करत आहे. मात्र, ही मोगलाई नाही असा घणाघातही त्यांनी केला. जिल्ह्यातील कर्जत येथे कर्जत-जामखेडचे पक्षाचे संभाव्य उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारार्थ पक्षाच्या वतीने निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते त्यांनी सरकारवर सडकून टीका केली.

विरोधातील आवाज दडपणारे हे दळभद्री सरकार - अजित पवारांची सडकून टीका

हेही वाचा -चिंचवड विधानसभेतून तृतीयपंथी निवडणूक लढणार

यावेळी त्यांनी रोहित पवारांवर बाहेरचे पार्सल म्हणून सातत्याने होणाऱ्या टीकेलाही उत्तर दिले. ते म्हणाले, विरोधक रोहित बाहेरचा उमेदवार आहे सांगतात. मात्र, घरच्यांना जमत नाही म्हणून बाहेरचा काम करणारा आला तर काय बिघडणार आहे, असा सवाल त्यांनी विरोधकांना केला. इतके वर्षे इतर उमेदवार आजमावले. मात्र, कर्जत-जामखेडचा विकास झाला नाही. आता एकदा रोहितला संधी देऊन पाहा. बारामती सारखाच चेहरा-मोहरा बदलू असे अजित पवार म्हणाले.

हेही वाचा -शरद पवारांना या वयातही फिरावे लागते हे क्लेशदायक - विनायक मेटे

फडणवीस सरकारच्या कर्जमाफीवर टीका करताना पवार यांनी सरकारने प्रत्यक्षात कर्ज माफी केली का, असा प्रश्नही उपस्थित केला. 3 ते 4 वर्ष कुठली कर्ज माफी असते, यांच्या काकाने केली का, माझ्या काकाने तरी एक झटक्यात कर्ज माफी केली, असा मार्मिक टोलाही पवार यांनी लगावला. यावेळी भाजपमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके,घनश्याम शेलार आदी नेते यावेळी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details