अहमदनगर -हैदराबाद येथील गुन्हेगारांचा एन्काऊंटर झाल्यानंतर दिल्लीच्या निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशी कधी दिली जाणार, असा प्रश्न समोर येत आहे. निर्भया प्रकरणातील आरोपींना लवकरच फाशी दिली जाईल. कायदेशीर बाबींना वेळ लागतो, असे दिल्लीच्या तिहार कारागृहाचे माजी कायदेशीर सल्लागार आणि जनसंपर्क अधिकारी सुनिल गुप्ता यांनी सांगितले. गुप्ता यांनी फाशीच्या प्रक्रियेसंदर्भात माहिती दिली. सुनिल गुप्ता साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येथे आले होते.
निर्भया प्रकरणातील आरोपींना लवकरच फाशी
दिल्लीच्या निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशी कधी दिली जाणार, असा प्रश्न समोर येत आहे. फाशीच्या प्रक्रियेसंदर्भात दिल्लीच्या तिहार कारागृहाचे माजी कायदेशीर सल्लागार आणि जनसंपर्क अधिकारी सुनिल गुप्ता यांनी माहिती दिली.
त्यांच्या कार्यकाळात सात गुन्हेगारांना फाशी देण्यात आली. त्यात कुख्यात गुन्हेगारांची जोडी रंगा-बिल्ला, इंदिरा गांधीचे मारेकरी, दहशतवादी अफजल गुरुचा समावेश आहे. एकावेळी किती जणांना फाशी देण्यात यावी, याबाबत मर्यादा नाहीत. तिहार कारागृहामध्ये एकाच वेळी दोघांना फाशी देण्यात आली आहे. एकाच वेळी चारही आरोपींनाही फाशी दिली जावू शकते, असे गुप्ता यांनी सांगीतले.
ज्या आरोपीला फाशी देण्यात येते, त्यांची शेवटची ईच्छा जाणून घेतली जाते. त्या व्यक्तीची मालमत्ता हस्तांतराचे रेकॉर्डही केले जाते. मात्र, आरोपीने बिर्यानी अथवा इतर काही पदार्थ खाण्याची मागणी केली, ती पुर्ण केली जात नाही, असे गुप्ता यांनी स्पष्ट केले. डेथ वॉरंट निघाल्यानंतर चौदा दिवसात फाशी देण्याची प्रक्रिया पुर्ण केली जाते.