महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिरेन मनसुख मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिसांवर आरोप करणे चुकीचे -बाळासाहेब थोरात

बई पोलिसांवर उगाच आरोप करणे चुकीचे आहे, सरकारे येतील आणि जातील पण सर्वांनी मुंबई पोलिसांवर विश्वास ठेवला पाहिजे, असे स्पष्टीकरणही थोरात यांनी दिले आहे. अहमदनगर मध्ये माध्यमांशी बोलताना थोरात यांनी सरकार आणि मुंबई पोलिसांची बाजू सावरत हे स्पष्टीकरण केले.

balasaheb thorat
बाळासाहेब थोरात

By

Published : Mar 6, 2021, 1:03 PM IST

Updated : Mar 6, 2021, 1:37 PM IST

अहमदनगर- मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडेल्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्राच्या खाडीमध्ये आढळून आला. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले आहे. त्यामुळे या मृत्यूप्रकरणाचे खरे कारण समोर जनतेसमोर यावे, ही घटना कशी घडली याचा तपास करून सत्य बाहेर आणले जावे, यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवला आहे. तो तपास व्यवस्थित होईल, अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री थोरात यांनी दिली आहे.

मुंबई पोलिसांवर आरोप करणे चुकीचे -बाळासाहेब थोरात

मुंबई पोलिसांवर विश्वास ठेवला पाहिजे-

विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या तपासावर शंका उपस्थित करत हा तपास एनआयएकडे देण्याची मागणी केली होती. त्यावर या प्रकरणात मुंबई पोलिसांवर उगाच आरोप करणे चुकीचे आहे, सरकारे येतील आणि जातील पण सर्वांनी मुंबई पोलिसांवर विश्वास ठेवला पाहिजे, असे स्पष्टीकरणही थोरात यांनी दिले आहे. अहमदनगर मध्ये माध्यमांशी बोलताना थोरात यांनी सरकार आणि मुंबई पोलिसांची बाजू सावरत हे स्पष्टीकरण केले. तसेच हिरेन मनसुख यांच्या पत्नीने पोलिसांबाबत केलेल्या आरोपांबद्दल आपणास काही माहीत नाही, असेही थोरात यावेळी याबाबत विचारलेल्यावर म्हणाले.

स्टॅम्प घोटाळ्याची चौकशी सुरू आहे-

नाशिक जिल्ह्यात समोर आलेल्या स्टॅम्प पेपर घोटाळ्याची चौकशी सुरू असून चौकशीत जे समोर येईल त्यावर पुढील निर्णय घेतला जाईल, असे थोरात यांनी यावेळी स्पष्ट केले.

Last Updated : Mar 6, 2021, 1:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details