पी. शिवा शंकर, बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया शिर्डी :राज्याचे महसूल मंत्री, राधाकृष्ण विखे पाटील यांनी दर्शन रांगेचे उद्घाटन, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचा घाट घातला होता. मात्र, पंतप्रधानांची वेळ मिळत नसल्याने येत्या 7 जुलैला राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते दर्शन रांगेचे उद्घाटन करावे अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
दर्शनासाठी भक्तांच्या लाबं रागा :शिर्डीला वर्षभरात दोन कोटीहून अधिक भाविक साई दर्शासाठी येतात. सलग सुट्यामध्ये एका दिवसात लाखाहून अधिक भाविक साई मंदिरात दर्शन घेतात. अश्यावेळी भक्तांच्या लाबंच लांब रांगा लागतात. भक्तांच्या सुविधेसाठी अद्यावत दर्शन क्यु कॉम्प्लेक्स उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचे भूमीपूजन 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते.
पंतप्रधानांच्या शुभहस्ते उद्घाटन :त्यानंतर अद्यावत दर्शनरांगेच्या इमारतीचे काम पूर्ण होऊन जवळापास एक वर्ष पूर्ण झाले. त्यानंतर शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटलांनी या दर्शन रांगेचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचे ठरवले होते. तसे निमंत्रणही पंतप्रधानांना देण्यात आले होते. मात्र, आता चार महिन्याचा कालावधी उलटल्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने संस्थानाशी पत्रव्यवहार करुन कामाबाबत विचारणा केली आहे, अशी माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर यांनी यांनी दिली आहे.
द्रौपदी मुर्मू हस्ते उद्घाटन करा : पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा विचार राजकीय वाटत असला तरी, भाविकांच्या भावना महत्त्वाच्या आहेत. साई संस्थानने प्रायोगिक तत्त्वावर दर्शन रांग सुरू केल्यास भाविकांच्या अडचणी, त्रुटी लक्षात येऊ शकतात. मात्र, कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेली दर्शन रांगेची इमारत केवळ उद्घाटनाच्या नावाखाली इतके दिवस पडून आहे. हे निश्चितच अशोभनीय आहे. त्यावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. द्रौपदी मुर्मू यांच्या शिर्डी दौऱ्यात 7 जुलैला उद्घाटनाचा मान प्रशासनाने दिल्यास देशात चांगला संदेश जाईल, असे थोरात यांनी म्हटले आहे.
हेही वाचा -Ashadhi Vari : शासकीय महापूजा कालावधीत मुखदर्शन सुरू ठेवावे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचना