महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदूर खंदरमाळ येथे 10 वर्षीय मुलाचा पाझर तलावात बुडून मृत्यू

शनिवारी सकाळी नांदूरखंदरमाळ येथील पोलीस पाटील किसन पंढरीनाथ सुपेकर हे पाझर तलावाजवळून जात असताना त्यांना एक मुलगा तळ्यात बुडाला असल्याचे दिसले.

By

Published : Aug 26, 2019, 9:11 AM IST

मृत यश बबन थोरात

अहमदनगर - संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ येथील पाझर तलावात १० वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यश बबन थोरात (वय १०, रा. नांदूर खंदरमाळ) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदूर खंदरमाळ येथील पाझर तलाव गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे हे तळे भरले आहे. शनिवारी सकाळी नांदूरखंदरमाळ येथील पोलीस पाटील किसन पंढरीनाथ सुपेकर हे पाझर तलावाजवळून जात असताना त्यांना एक मुलगा तळ्यात बुडाला असल्याचे दिसले. त्यानुसार, त्यांनी घारगाव पोलीस ठाण्याच्या कळविले.

त्यानंतर घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक योगेश मोहिते, पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास देशमुख, संतोष खैरे, किशोर लाड यांनी तळ्यातून मुलाला बाहेर काढले. घारगाव पोलीस ठाण्यात पोलीस पाटील किसन सुपेकर यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details