महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अहमदनगर : चोरट्यांचा एटीएम फोडण्याचा प्रयत्न, पुढे काय झाले वाचा...

सावेडी उपनगरात असलेले बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम आज पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. पण सकाळी नागरिक फिरण्यासाठी त्या परिसरात आले होते. यामुळे चोरटे पसार झाले.

burglars attempted to break ATMs in ahmednagar
अहमदनगर : चोरट्यांचा एटीएम फोडण्याचा प्रयत्न, पुढे काय झाले वाचा...

By

Published : Nov 11, 2020, 5:15 PM IST

अहमदनगर - सावेडी उपनगरातील पाइप लाइन रोडवर असलेले महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न अज्ञातांनी केला आहे. आज पहाटे चारच्या सुमारास हा प्रयत्न झाल्याचे समजते. मात्र एटीएम फोडून त्यातील पैसे चोरण्यात चोरट्यांना यश आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळी स्थानिक नागरिक फिरण्यास बाहेर पडल्यानंतर त्यांच्या एटीएम फोडल्याचे लक्षात आले. त्यानंतर स्थानिक तोफखाना पोलिसांना ही बाब कळवण्यात आल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी बँकेला कळवले असून बँकेच्या अधिकाऱ्यांकडून सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाल्यानंतर चोरट्यांचा तपास लावण्यात मदत होणार आहे. एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला असला तरी एटीएममधील रक्कम सुरक्षित असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे.

शहरातील एटीएम 'राम भरोसे'
महाराष्ट्र बँकेच्या या एटीएमला सुरक्षा रक्षकच नाही. शहरात अनेक बँकांची एटीएम असून अनेक ठिकाणी सुरक्षा रक्षकच नसल्याचे पुढे आले आहे. सुरक्षा रक्षक नसल्याने एटीएम फोडण्याचे अनेकदा प्रकार पुढे येतात. मात्र संबंधित बँक व्यवस्थापन याबाबतीत दुर्लक्ष करत असल्याचे अनेकदा दिसून येते.

ABOUT THE AUTHOR

...view details