अहमदनगर- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे. अपेक्षेप्रमाणे राधाकृष्ण विखे-पाटील यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. पक्ष बदलणे हा विखे घराण्याचा इतिहासच आहे. त्यामुळे भाजपमध्ये तरी त्यांचे मन रमते का? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर पाहुयात राधाकृष्ण विखे-पाटील यांचा राजकीय इतिहास .
भाजपमध्ये अधिकृत प्रवेश घेण्याआधीच त्यांच्या गळ्यात कॅबीनेट मंत्रिपदाची माळ पडली आहे.
व्यक्ती परिचय -
संपूर्ण नाव - राधाकृष्ण एकनाथराव विखे-पाटील
जन्म तारीख - १५ जून १९५९
शैक्षणिक पात्रता - बी.एस्सी. (कृषी)
- १ मार्च १९९५ पासून विधानसभा सदस्य, महाराष्ट्र राज्य, मुंबई
- १९९७ ते १९९९ मंत्री, कृषी, जलसंधारण, दुग्ध व्यवसाय, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, मुंबई
- जुलै १९९९ विधानसभा सदस्यपदी निवड
- ऑक्टोबर २००४, विधानसभा सदस्यपदी निवड
- १९ फेब्रूवारी २००९, मंत्री, शालेय शिक्षण, विधी व न्याय तथा पालकमंत्री, औरंगाबाद जिल्हा, महाराष्ट्र राज्य, मुंबई
- ऑक्टोबर २००९ विधानसभा सदस्यपदी निवड
- ७ नोव्हेंबर २००९ मंत्री, परिवहन, बंदरे आणि विधी व न्याय महाराष्ट्र राज्य, मुंबई
- १९ नोव्हेंबर २०१० ते २७ सप्टेंबर २०१४ मंत्री, कृषी व पणन, तथा पालकमंत्री अमरावती जिल्हा, महाराष्ट्र राज्य, मुंबई
- १९ ऑक्टोबर २०१४ विधानसभा सदस्यपदी निवड
- १० नोव्हेंबर २०१४ काँग्रेस विधीमंडळ गटनेतेपदी निवड
- २४ डिसेंबर २०१४ ते ४ जून २०१९ महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते
संघटनात्मक पदे -
- १९८५-१९९० अध्यक्ष अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेस (आय)
- १९८८-१९९० सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस (आय)
- काँग्रेस शताब्दी वर्षात स्वातंत्र्य सैनिक सत्कार सोहळ्याचे आयोजन भारत बनाओ कार्यक्रमाचे आयोजन
उद्योग क्षेत्र -
- २६ फेब्रूवारी १९८७ ते १७ऑक्टोबर १९९४
- चेअरमन, पद्मश्री डॉ. विट्ठलराव विखे पाटील सह.सा.का.लि., प्रवरानगर ता. राहाता, जि. अहमदनगर१८ ऑक्टोबर १९९४ ते ३१ ऑक्टोबर २००४
- संचालक, पद्मश्री डॉ. विट्ठलराव विखे पाटील सह.सा.का.लि., प्रवरानगर ता. राहाता, जि. अहमदनगर
- १४ जुलै १९८४ ते ५सप्टेंबर १९८४
- मुख्य प्रवर्तक, प्रवरा फळे भाजीपाला उत्पादक व प्रक्रिया खरेदी विक्री शेतकरी सहकारी संस्था मर्या., प्रवरानगर, ता. राहाता, जि. अहमदनगर
- ०६ सप्टेंबर १९८४ ते ३० जून १९८९
- चेअरमन, प्रवरा फळे भाजीपाला उत्पादक व प्रक्रिया खरेदी विक्री शेतकरी सहकारी संस्था मर्या., प्रवरानगर, ता. राहाता, जि. अहमदनगर
- ०१ जुलै १९८९ ते १४डिसेंबर २००४
- संचालक, प्रवरा फळे भाजीपाला उत्पादक व प्रक्रिया खरेदी विक्री शेतकरी सहकारी संस्था मर्या., प्रवरानगर, ता. राहाता, जि. अहमदनगर