महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'पाच वर्षातील अपयश लपवण्यासाठी सरकार भावनिक मुद्दे काढतंय'

दरम्यान, सर्व विभागात देश पातळीवरचे युवा प्रचारक आहेत ते सक्रीय होतील. ज्योतीरादीत्य शिंदे, सचिन पायलट यांचीही प्रचारासाठी मागणी होते असून सोनिया गांधी, प्रियंका आणि राहुल गांधींनाही आम्ही आमंत्रित करत असल्याचे थोरात म्हणाले.

बाळासाहेब थोरात

By

Published : Oct 9, 2019, 7:52 AM IST

शिर्डी- लोकसभेची निवडणूक भाजपने भावनिक मुद्द्यांवर लढवली व त्याचा त्यांना फायदाही झाला. मात्र, राज्याच्या निवडणुका या वेगळ्या असतात. स्थानिक प्रश्नावर त्या लढवल्या जातात. त्यामुळे परत भुलथापांना जनता फसणार नसल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे. तसेच मागील पाच वर्षातले हे अपयशी सरकार असल्याची टीकाही थोरात यांनी युती सरकारवर केली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात

हेही वाचा - शरद पवार, अजित पवार यांच्यावर टीका; मात्र उध्दव ठाकरेंकडून 'आरे'चा उल्लेखही नाही

भटकावणाऱ्या मुद्दयावर जनता आता विश्वास ठेवणार नाही. आपल्या झालेल्या अपयशामुळे हे सरकार भावनिक मुद्दे काढत असल्याचे थोरात यांनी सांगितले. १९९९ साली राष्ट्रवादीची निर्मीती झाली. परंतु, पूरोगामी लोकशाही आघाडी म्हणून आम्ही काम करत आहोत. आघाडीबद्दल पुढे काय होईल हे आता तरी सांगता येत नाही. मात्र, आमची विचारधारा सारखी असून आम्ही पुढेही सोबत काम करू, असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा - 'पालकमंत्रीपद काय असते, हे न कळणारी व्यक्ती म्हणजे परिणय फुके'

दरम्यान, सर्व विभागात देश पातळीवरचे युवा प्रचारक आहेत ते सक्रीय होतील. ज्योतीरादीत्य शिंदे, सचिन पायलट यांचीही प्रचारासाठी मागणी होते असून सोनिया गांधी, प्रियंका आणि राहुल गांधींनाही आम्ही आमंत्रित करत असल्याचे थोरात म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details