अहमदनगर- समाधानकारक पाऊस न पडल्याने तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाकडून पाथर्डी तालुक्यात गुरुवारी कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात आला. हा प्रयोग काही प्रमाणात यशस्वी झाल्याचे चित्र दिसत असून पाथर्डी तालुक्यातील पूर्व दक्षिण भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे.
जूनच्या सुरुवातीला झालेल्या थोड्याफार पावसामुळे शेतकऱ्यांनी कपाशी, बाजरी, मका, इत्यादी पिकांची मोठ्या प्रमाणावर पेरणी केली. मात्र तालुक्यातील पश्चिम भागात अद्यापही दुष्काळी परिस्थिती कायम आहे. त्यामुळे पावसाअभावी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांची पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शासनातर्फे प्रथमच औरंगाबाद येथील विमानतळावरून विमानाच्या साहाय्याने तालुक्यात कृत्रिम पाऊस पाडण्यात आला.