अहमदनगर -जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड येत्या 31 डिसेंबरला होत आहे. त्याअनुषंगाने प्रशासनाने पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम घोषित केला आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीची तयारी सुरू केली आहे. शुक्रवारी (27 डिसेंबर) काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, क्रांतिकारी शेतकरी पक्षांच्या बैठकांचा सिलसिला होणार आहेत. विखे, पिचड, नागवडे गटाच्या पक्षांतरामुळे बदलत्या राजकीय परिस्थितीत महाविकास आघाडी आणि भाजपकडून विखे-पिचड गट संख्या जुळवून मिनी मंत्रालयाची पदे आपल्याच ताब्यात कशी राहतील यासाठी प्रयत्नशील असणार आहे. मात्र, काँग्रेसच्या फुटीमुळे पक्षासाठी व्हीप कुणाचा लागू होतो यावर ही निवड अवलंबून आहे.
जिल्हा परिषदेच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड 31 डिसेंबरला दुपारी 3 वाजता होणार आहेत. जिल्हा परिषदेच्या पुढील अडीच वर्षांच्या कार्यकाळासाठी या निवडी होणार आहेत. सध्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता आहे. याआधी अडीच वर्षांसाठी अध्यक्षपद काँग्रेसकडे व उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे होते. त्यानंतर आता या पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रबळ दावेदार मानली जात आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे, त्याच पद्धतीने जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडीचा कित्ता गिरवला जाण्याची शक्यता आहे. विशेष बाब म्हणजे यात नेवासा मतदारसंघाचे आमदार शंकरराव गडाख यांचा क्रांतिकारी शेतकरी पक्ष सहभागी होत असल्याने महाविकास आघाडीचे पारडे जड मानले जात आहे. जिल्हा परिषदेत मागील अडीच वर्षांच्या काळात अध्यक्षपद काँग्रेसकडे होते. त्यामुळे यावेळी अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रबळ दावेदार मानली जात आहे. पक्षाकडून जिल्हा परिषदेच्या विद्यमान उपाध्यक्षा राजश्री घुले यांचे नाव आघाडीवर आहे.
व्हीप महत्वाचा ठरणार -