महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अहमदनगर दाम्पत्य मारहाण प्रकरण : पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न

जिल्ह्यातील दाम्पत्यांना नग्न करून मारहाण करत त्यांच्या व्हिडिओ व्हायरल झालेल्या महिने फिनेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

By

Published : Mar 5, 2020, 12:14 PM IST

अहमदनगर जिल्हा रुग्णालय
अहमदनगर जिल्हा रुग्णालय

अहमदनगर- जिल्ह्यातील दाम्पत्यांना नग्न करून मारहाण करत त्यांच्या व्हिडिओ व्हायरल झालेल्या महिने फिनेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

2016 साली सामूहिक बलात्कार झालेल्या पीडितेला पतीसह नग्नावस्थेत पेट्रोल टाकून मारहाण करण्यात आली. याबाबत पोलीस त्यांच्या घरी जाऊन जबाब नोंदवून घेत होते. त्यावेळी पीडितेने अचानक घरात असेलेले फिनेल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने हे प्रकरण गंभीर वळत घेण्याची शक्यता आहे.

अहमदनगर दाम्पत्य मारहाण प्रकरण : पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न

पीडितेला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. पीडिता आणि तिच्या पतीने 2 फेब्रुवारीला दहा जणांनी नग्न करत अंगावर पेट्रोल टाकून बेदम मारहाण केल्याचा आरोप एका व्हिडिओ क्लिपद्वारे केला आहे. पोलीस सध्या या व्हिडिओच्या सत्यतेची तपासणी करत असून आरोपी आणि पीडित पती-पत्नीची चौकशी करून जबाब नोंदवून घेत आहेत. पोलिसांच्या भूमिकेवर पीडित पती-पत्नीने अनेकदा न्यायालयात आरोप केलेले आहेत. राज्यात हे प्रकरण गाजत असताना विधिमंडळात यावर चर्चा झाली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाची एक महिन्यात चौकशी करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. दरम्यान, गुरुवारी (दि. 4 मार्च) नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महासंचालक छेरिंग दोरजे यांनी अहमदनगरमध्ये येत यासंपूर्ण प्रकरणाची माहिती घेत तपासाबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

हेही वाचा -अहमदनगर घटनेची महिला आयपीएस अधिकाऱ्याकडून होणार चौकशी

ABOUT THE AUTHOR

...view details