महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नगरमधील डोंगरगण-मांजरसुंबा परिसरात ढगफुटी..शेतीचे प्रचंड नुकसान; प्रशासन मात्र सुस्त

नगर तालुक्यातील डोंगरगण, मांजरसुंबा, वांबोरी घाट परिसरात सोमवारी ढगफुटी झाल्याने परिसरातील शेतीचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांनी केलेल्या पेरण्या वाहून गेल्या आहेत.

ढगफुटी

By

Published : Jul 2, 2019, 8:29 PM IST

अहमदनगर- नगर तालुक्यातील डोंगरगण, मांजरसुंबा, वांबोरी घाट भागात ढगफुटी झाल्याने परिसरातील शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी या भागातील केलेल्या पेरण्या अतिवृष्टीमुळे वाया जाणार असून अडचणीत असलेला शेतकरी अजून आर्थिक अडचणीत येणार आहे.

नगर तालुक्यात ढगफुटी


सोमवारी सांयकाळनंतर नगर तालुक्यातील डोंगरगण, मांजरसुंबा, वांबोरी घाट, आढाववाडी, जेऊर आदी परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. डोंगरगण येथील पर्जन्यमापक यंत्रावर तब्बल 140 मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती येथील तलाठी निकिता शिरसाट यांनी दिली आहे. या जोरदार पावसामूळे शेतकऱ्यांनी केलेल्या पेरण्या बूडण्याचे संकेत आहेत.


नगर तहसील सुस्त

नगर तालुक्यातील अनेक गावांत ढगफुटी आणि अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असतानाही नगर तहसील कार्यालय या नुकसानीबाबत असंवेदनशील दिसून आली. तहसीलदार उमेश पाटील यांच्या सह नायब तहसीलदार कार्यालयीन कामकाज आणि शासकीय बैठकांत व्यस्त असल्याचे दिसले. पर्जन्यग्रस्त भागात किती पाऊस झाला, शेती आणि पेरण्यांचे नुकसान किती आदी कोणतीही माहिती या ठिकाणी उपलब्ध नव्हती. आणि कॅमेऱ्यासमोर बोलण्यास या अधिकाऱ्यांना वेळही नव्हता. यामुळे नगर तहसील प्रशासनाच्या सुस्त कामकाजाचा भोंगळपणा दिसून आला.


डोंगरगण परिसरात शेतीचे प्रचंड नुकसान, वाहतुकीवर परिणाम

नगर-वांबोरी मार्गावर तसेच औरंगाबाद रोडवरील जेऊर, आढाववाडी परिसरास सोमवारी सांयकाळपासून पावसाने चांगलेच झोडपले असून परिसरातील ओढे-नाले दूथडी भरून वाहू लागल्याने पूर परस्थिती उद्भवली. नगर-वांबोरी मार्ग काल उशिरापर्यंत वाहतुकीसाठी बंद असल्याने नागरिकांचे खूप हाल झाले. ढगफुटीमुळे पेरण्या केलेल्या शेतात पाणीच पाणी साचून ओसंडून वाहत होते. अनेकांचे शेतीचे बांध फुटले तर शेतातील उपयुक्त माती पाण्याबरोबर वाहून गेली. पावसाच्या बहुप्रतिक्षेत असलेल्या बळी राजाला या ढगफुटी आणि अतिवृष्टीमुळे पुन्हा हतबल होण्याची वेळ आली असून सुस्त महसूल प्रशासन केव्हा मदतीला येणार याची त्याला प्रतीक्षा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details