अहमदनगर- शेख अमीर रशीद या तरुणावर शहरातील प्रेमदान चौकातील एका हॉटेलमध्ये काळ्या बुरखाधारी अज्ञाताने अॅसिड टाकून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. हल्लेखोर बुरख्यात असल्याने हल्ल्याबाबत तर्कवितर्क व्यक्त होत असून तोफखाना पोलीस अधिक चौकशी करत आहेत.
याबाबत एका तरुणीकडून पोलीस माहिती घेत आहेत.
अहमदनगरमध्ये तरुणावर बुरखाधारी अज्ञाताचा अॅसिड हल्ला
अहमदनगर - शेख अमीर रशीद या तरुणावर शहरातील प्रेमदान चौकातील एका हॉटेलमध्ये काळ्या बुरखाधारी अज्ञाताने अॅसिड टाकून गंभीर जखमी केल्याची घटना घडली.
हल्लेखोर स्त्री की पुरुष याबाबत पोलीस तपास करत असून अद्याप पोलिसांनी कुठलाही गुन्हा दाखल केला नाही.
बीड जिल्ह्यातील आष्टीचा शेख अमीर रशीद हा मित्र अझहर शेख याच्यासमवेत संगणक दुरुस्ती कामानिमित्ताने आज अहमदनगर येथे आला होता. यावेळी दुपारी प्रेमदान चौकातील एका हॉटेल बाहेर असताना तिथे आलेल्या एका बुरखाधारी अज्ञात व्यक्तीने त्याच्या डोक्यावर अॅसिड टाकून लागलीच पोबारा केला. अचानक झालेल्या या हल्ल्यात शेख अमीर रशीद गंभीर जखमी झाला. त्याला प्रथम जिल्हा शासकीय रुग्णालयातील उपचानंतर त्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलीस याबाबत जखमी तरुणाचे मित्र, घरातील व्यक्ती आदींकडून माहिती घेत आहेत. सोबत असलेला मित्र अझहर शेखने अज्ञात व्यक्ती स्त्री होती की पुरूष अशी शंका व्यक्त केल्याने प्रकरणाचे गूढ वाढले आहे.