महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 18, 2020, 7:16 AM IST

ETV Bharat / state

जामीन होत नसल्याने आरोपीचा कोठडीतच आत्महत्येचा प्रयत्न, चमच्याने फाडले स्वत:चे पोट

राहुरी पोलीस ठाण्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या वृद्ध आरोपीने, जामीन होत नसल्याने, चमचाने स्वत:चे पोट फाडून कोठडीतच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

accused attempted suicide custody At rahuri ahmednagar
जामीन होत नसल्यामुळं आरोपीनं कोठडीतचं चमच्यानं फाडलं स्वत:चं पोट

अहमदनगर - राहुरी पोलीस ठाण्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या वृद्ध आरोपीने, जामीन होत नसल्याने, चमचाने स्वत:चे पोट फाडून कोठडीतच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामुळे खळबळ उडाली. गणपत भाऊराव तुपे असे त्या आरोपीचे नाव आहे.

'ईटीव्ही भारत'ला मिळालेल्या माहितीनुसार, गणपत तुपे (वय. ७८, रा.वांबोरी ता. राहुरी) याला भादंवि कलम ३०७, ३५४ (अ), ५०४ या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याला राहुरी पोलीस ठाण्यामध्ये ठेवण्यात आले होते. तो मागील अनेक दिवसांपासून जामीन मिळवण्यासाठी प्रयत्नात होता. पण त्याला जामीन मिळत नव्हता.

जामीन होत नसल्यामुळं आरोपीनं कोठडीतचं चमच्यानं फाडलं स्वत:चं पोट..

तेव्हा त्याने औषध घेण्यासाठी ठेवलेल्या चमच्याच्या साह्याने स्वत:चे पोट फाडून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. काही दिवसांपूर्वीच कारागृहात दोन कैद्यामध्ये हाणामारी झाल्याची घटना समोर आली होती. यात एका कैद्याचा दात तुटला होता.

हेही वाचा -अहमदनगर : संगमनेर तालुक्यातील ४, तर अकोले तालुक्यातील एकास कोरोनाची लागण

हेही वाचा -अहमदनगर; चीनच्या आगळीकीचा शिवसेनेकडून चिनी झेंडा जाळून निषेध...

ABOUT THE AUTHOR

...view details