अहमदनगर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जामखेड आणि संगमनेरसाठी दिलासादायक बातमी आहे. या दोन ठिकाणच्या कोरोनाची लागण झालेल्या 8 रुग्णांचा 14 दिवसानंतरचा दुसरा अहवालही निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे हे रुग्ण आता कोरोनामुक्त झाले आहेत. जामखेड येथील 4 तर संगमनेर येथील 4 (शहरातील तीन आणि तालुक्यातील आश्वी येथील एक) असे एकूण 8 रुग्णांचा दुसरा अहवाल कोरोनामुक्त आल्याने जिल्ह्यात दिलासादायक वातावरण आहे.
दिलासादायक! जामखेड, संगमनेरमधील 8 कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जामखेड आणि संगमनेरसाठी दिलासादायक बातमी आहे. या दोन ठिकाणच्या कोरोनाची लागण झालेल्या 8 रुग्णांचा 14 दिवसानंतरचा दुसरा अहवालही निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे हे रुग्ण आता कोरोनामुक्त झाले आहेत.
जामखेड, संगमनेरमधील 8 कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त...
या सर्व 8 कोरोनामुक्त रुग्णांना नगरच्या बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात येणार असला तरी पुढील 14 दिवस त्यांना त्यांच्या शहरात संस्थात्मक क्वारंटाईन राहावे लागणार आहे. जिल्ह्यात सध्या २९ रुग्ण असून यापूर्वी 3 आणि आजचे 8 असे 11 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर जामखेड आणि कोपरगाव येथील एक-एक अशा 2 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.
TAGGED:
corona news in ahemdnagar