अहमदनगर - कोपरगाव या विधानसभा मतदारसंघात पारंपरिक काळे विरुध्द कोल्हेअशी लढत रंगते. मात्र, यावेळी वहाडणे आणि परजणे हे अपक्ष उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. त्यामुळे कोपरगावात यावेळी चौरंगी लढत होणार आहे. यासंदर्भात ईटीव्ही भारतने घेतलेला हा आढावा.
विधानसभा निवडणूक 2019 : अहमदनगरमधील कोपरगाव विधानसभेत चौरंगी लढत हेही वाचा -काँग्रेसचं सध्या चाललयं काय? बाळासाहेब थोरात यांची अनकट मुलाखत
गोदावरी नदीच्या किनारी वसलेल्या आणि पौराणिक पार्श्वभूमी असलेल्या कोपरगाव विधानसभा मतदार संघात गेल्या अनेक निवडणुकींपासुन काळे आणि कोल्हे या 2 घराण्यांमध्ये राजकीय लढाई होत राहिली आहे. याच बरोबरीने भाजपचे ज्येष्ठ नेते सुर्यभान पाटील-वहाडणे आणि नामदेवराव परजणे गटाचेही प्रभुत्व राहीले आहे. विधानसभेवर मात्र आलटुन पालटुन काळे आणि कोल्हे या घराण्यातील व्यक्तींनीच जास्त काळ प्रतिनिधीत्व केले आहे. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आता भाजपात असलेल्या कोल्हे कुटुबीयांच्या सून स्नेहलता कोल्हे या दुसऱ्यांदा भाजपच्या उमेदवार म्हणुन निवडणूक लढवत आहेत. तर पूर्वी काँग्रेसनंतर शिवसेना आणि आता राष्ट्रवादीत असलेल्या काळे घराण्यातील युवक आशुतोष काळे हे राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत आहेत.
हेही वाचा -सत्ता आणि बहुमताची भाजपला मुजोरी, राज ठाकरे यांचा हल्लाबोल
गेल्या पाच वर्षात सत्तेत असताना केलेला तालुक्याचा विकास आणि मोदींचे व्हिजन मतदारांसमोर मांडत स्नेहलता कोल्हे प्रचार करत आहेत. ते पुन्हा एकदा कोपरगावचे प्रतिनिधत्व देण्याची साद मतदारांना घालत आहेत. कोपरगावात शंकरराव कोल्हे संजीवनी सहकारी साखर कारखाना, संजिवनी शैक्षणिक संस्थाच्या माध्यमातुन कोल्हे घराणे तालुक्यात काम करत आहे. स्नेहलता कोल्हे यांनी बचत गट महिलांचे मोठे संघटनही तालुक्यात उभे केले आहे.
हेही वाचा -मुख्यमंत्री आज विदर्भात तर, पवार मराठवाड्यातील या जिल्ह्यात घेणार सभा
तर दुसरीकडे कोपरगाव सहकारी साखर कारखाना, गौतम शैक्षणिक संस्था आणि कोपरगाव पंचायत समितीत आणि तालुक्यातील जिल्हा परिषदेत 4 सदस्य असे राजकीय वर्चस्व काळे गटाच वर्चस्व आहे. यावेळी दुसऱ्यांदा आशुतोष काळे हे निवडणूक रिंगणात उभे आहेत. गेल्या 5 वर्षांत तालुक्यात न झालेला विकास आणि कोपरगाव शहराच्या पाणी पुरवठ्या साठीचा वाढीव साठवण तलाव तसेच गोदावरी कालव्याचे हक्काचे पाणी शेतकऱ्यांना मिळावे हे मुद्दे घेवून राष्ट्रवादीचे उमेदवार आशुतोष काळे निवडणूक लढवत आहेत.
हेही वाचा -महाराष्ट्र दौरा : नरेंद्र मोदींच्या 'या' शहरात होणार सभा, स्मृती इराणींची माहिती
या मतदार संघात भाजपशी एकनिष्ठ राहिलेल्या दिवंगत सुर्यभान पाटील-वहाडणे यांचे पुत्र विजय वहाडणे यांनी नगरपालिका निवडणुकीच्या वेळीही पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी तिकीट मागितले होते. मात्र, पक्षाने त्यांच्या ऐवजी कोल्हे गटाच्या पराग संधान यांना तिकिट दिले होते. त्यामुळे विजय वहाडणेंनी अपक्ष निवडणूक लढवली आणि ते नगराध्यक्ष झाले. त्यानंतर 3 वर्षे वहाडणे विरुध्द कोल्हे असा संघर्ष सुरुच होता. आता विधानसभा निवडणुकीच्या वेळीही वहाडणे भाजपच्या उमेदवारा विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारात कोपरगाव शहराच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न केंद्रस्थानी आहे.
हेही वाचा -बंडखोरांची शिवसेनेतून हकालपट्टी, ५ जणांवर कारवाई
या सोबतच मतदार संघातील 13 गावे ही राधाकृष्ण विखे-पाटलांच्या राहाता तालुक्यात आहेत. तसेच कोपरगावच्या निवडणुकीत विखे यांची आणि त्यांची सासुरवाडी असलेल्या परजणे गटाची भूमिका महत्वाची राहिलेली आहे. आता विखे-पाटील भाजपमध्ये गेले आहेत आणि नात्याने भाची असलेल्या स्नेहलता कोल्हे या भाजपच्या उमेदवार आहेत. तर दुसरीकडे राधाकृष्ण विखे यांचे मेव्हणे आणि जिल्हा परिषद सदस्य असलेले राजेश परजणे हेही अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यांनीही भाजपकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, त्यांना भाजपने उमेदवारी दिली नाही. तालुक्यातील जनतेच्या आग्रहाखातर परीवर्तन करण्यासाठी आणि कोपरगाव शहरासह तालुक्याचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी मी निवडणूक लढवत असल्याचे परजणे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा -शिवसेनेचा वचननामा शनिवारी होणार जाहीर
कोपरगाव शहरासह तालुक्यातील रस्त्यांची झालेली दुरावस्था, गोदावरी कालव्यातून मिळणाऱ्या पाण्यात होत जाणारी घट तसेच अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या शहराचा पाणी प्रश्न सोडविण्याचा दावा करत निवडणुकीचा प्रचार रंगत आहे. तसेच मतदारसंघात सर्वच पक्षात थोडीफार नाराजी आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मतदारांचा कौल कोणाच्या पारड्यात पडतो आणि कोपरगावचा आमदार म्हणून विधानसभेत कोणाला संधी मिळते हे 24 तारखेलाच स्पष्ट होणार आहे.