मुंबई - साईबाबांच्या चरणी नेहमीच सोने-चांदी आणि हिरे मोती याचे दान येत असते. साईंच्या सिंहासनासह मंदिरातील गाभारा व अन्य सर्व वस्तू सोन्याच्या झाल्या आहेत. त्यामुळे भाविक आता साईंच्या चरणी वेगळ्या पद्धतीने सोन दान करत आहेत. आंध्रप्रदेश राज्यातील बापटला येथील दानशुर साईभक्त अन्नम सतिष प्रभाकर यांनी ७७० ग्रॅम ( gold crown weighing 770 grams donated to Saibaba Sansthan ) वजनाचा ३६ लाख ९८ हजार ३१० रुपये किंमतीचा सोन्याचा मुकुट दान केले आहे. शिवाय ६२० ग्रॅम वजनाचे ३३ हजार ४८० रुपये किंमतीचे चांदीचे ताट साईबाबा संस्थानला देणगी स्वरुपात दान केले आहे. साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्याकडे रक्षाबंधनाच्या दिवशी हे दान सुपूर्त करण्यात आले आहे.
Saibaba Sansthan आंध्रप्रदेशातील भक्ताने साईचरणी अर्पण केला 36 लाखांचा सोन्याचा मुकुट; 620 ग्रॅम वजनाचे चांदीचे ताटही केले दान
आंध्रप्रदेश राज्यातील बापटला येथील दानशुर साईभक्त अन्नम सतिष प्रभाकर यांनी ७७० ग्रॅम ( gold crown weighing 770 grams donated to Saibaba Sansthan ) वजनाचा ३६ लाख ९८ हजार ३१० रुपये किंमतीचा सोन्याचा मुकुट दान केले आहे. शिवाय ६२० ग्रॅम वजनाचे ३३ हजार ४८० रुपये किंमतीचे चांदीचे ताट साईबाबा संस्थानला देणगी स्वरुपात दान केले आहे.
भक्तांनी श्री साई संस्थांनात आजपर्यंत कोट्यावधी रुपयांच्या भेटवस्तू दिल्या आहेत. साईमंदिराचा कळस, बाबांचे सिंहासन, साईंची समाधी, मुर्तीचा मुकूट, माळा, मंदिराचा गाभारा, दर्शन भाग व खांब, पुजेचे ताट, शंख, आरती, पाण्याचा लोटा, घंटी , नैवद्याचे ताट, अशा सर्व सोन्याच्या वस्तू दान स्वरुपात देण्यात आल्या आहेत. त्यातच गेल्या महीण्यातच हैद्राबादच्या एका भत्तांने आपल्या पत्नीच्या अंतीम इच्छेनुसार 33 लाखांचा सुवर्ण मुकुट दिला होता. तर 7 ऑगस्टला दिल्लीचे साईभक्त ऋषभ लोहिया यांनी एक आगळ वेगळे दान म्हणून साईचरणी सोन्याची बासरी अर्पण केली होती.
हेही वाचा -Gold flute Shirdi - शिर्डीच्या द्वारकाधीशला सोन्याची बासरी; किंमत वाचून व्हाल थक्क
TAGGED:
Saibaba Sansthan