महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

गतविजेत्या बार्टीची फ्रेंच ओपनमधून माघार

बार्टीने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ही माहिती दिली. ती म्हणाली, ''मागील वर्षीची फ्रेंच ओपन स्पर्धा ही माझ्या कारकीर्दीतील सर्वात खास स्पर्धा होती, म्हणून मी हा निर्णय सहज घेतलेला नाही. माझ्या निर्णयाला दोन कारणे आहेत. प्रथम आरोग्याला धोका. दुसरे म्हणजे, माझी तयारी.''

Top ranked ashleigh barty won't defend french open title citing covid-19 risks
गतविजेत्या बार्टीची फ्रेंच ओपनमधून माघार

By

Published : Sep 8, 2020, 5:12 PM IST

नवी दिल्ली -जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकाची आणि गतविजेती ऑस्ट्रेलियन महिला टेनिसपटू एश्ले बार्टीने ग्रँडस्लॅम स्पर्धा फ्रेंच ओपनमधून माघार घेतली आहे. यावर्षी युरोपमध्ये खेळणार नसल्याचेही बार्टीने म्हटले आहे. वर्षाची दुसरी ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेली फ्रेंच ओपन स्पर्धा यंदा कोरोनामुळे वर्षाच्या अखेरीस खेळवण्यात येणार आहे.

बार्टीने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ही माहिती दिली. ती म्हणाली, ''मागील वर्षीची फ्रेंच ओपन स्पर्धा ही माझ्या कारकीर्दीतील सर्वात खास स्पर्धा होती, म्हणून मी हा निर्णय सहज घेतलेला नाही. माझ्या निर्णयाला दोन कारणे आहेत. प्रथम आरोग्याला धोका. दुसरे म्हणजे, माझी तयारी.''

बार्टी पुढे म्हणाली, ''स्पर्धेची तयारी माझ्या प्रशिक्षकाशिवाय होऊ शकत नाही. कारण ऑस्ट्रेलियामधील सीमाबंदीमुळे ते प्रशिक्षण देऊ शकत नाहीत. या स्पर्धेच्या यशासाठी खेळाडू, फ्रान्स फेडरेशनला मी शुभेच्छा देते. आता मी ऑस्ट्रेलियातील आगामी उन्हाळी हंगामाकडे लक्ष केंद्रित करत आहे. हे माझ्यासाठी खूपच आव्हानात्मक आहे. टेनिसबद्दल मी निराश असले तरी आरोग्याबद्दल, माझे कुटुंब आणि माझ्या संघाची सुरक्षा सध्या माझ्यासाठी प्राथमिकता आहे."

फ्रेंच ओपन स्पर्धा मे महिन्यात खेळवण्यात येणार होती. मात्र, कोरोनामुळे ती २७ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबरदरम्यान खेळवण्यात येईल.''

ABOUT THE AUTHOR

...view details