पॅरिस -स्पेनच्या राफेल नदालने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. नदालने रविवारी पुरुष एकेरीच्या तिसर्या फेरीत अमेरिकेच्या सेबस्टियन कोर्डाला सरळ सेटमध्ये पराभूत करून अंतिम-८ मध्ये प्रवेश केला.
फ्रेंच ओपन : राफेल नदालची उपांत्यपूर्व फेरीत धडक
नदालने फ्रेंच ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. 'लाल मातीचा बादशहा' नदालने २० वर्षीय युवा कोर्डाला ६-१, ६-१, ६-२ असे पराभूत केले. नदालने एक तास ५५ मिनिटांत हा सामना जिंकला.
'लाल मातीचा बादशहा' नदालने २० वर्षीय युवा कोर्डाला ६-१, ६-१, ६-२ असे पराभूत केले. नदालने एक तास ५५ मिनिटांत हा सामना जिंकला. द्वितीय मानांकित नदालचा सलग चौथ्यांदा फ्रेंच ओपन जिंकण्याचा मानस आहे. उपांत्यपूर्व फेरीत त्याचा सामना अलेक्झांडर ज्वेरेव आणि जेनिक सिनर यांच्यातील विजेत्याशी होईल.
"खरे तर, सेबस्टियनचे भविष्य अतिशय उज्ज्वल असेल. तो एक हुशार खेळाडू आहे आणि तो केवळ २० वर्षांचा आहे", असे नदालने विजयानंतर सांगितले. तत्पूर्वी, दिग्गज महिला टेनिसपटू आणि विजेतेपदाची प्रबळ दावेदार असलेली रोमानियाची सिमोना हालेप फ्रेंच ओपनमधून बाहेर पडली आहे. एका वृत्तानुसार, चौथ्या फेरीत पोलंडची १९ वर्षाची इगा स्वितेकने हालेपला ६-१, ६-२ अशा सरळ सेटमध्ये मात दिली. जागतिक क्रमवारीत स्वितेक ५८व्या स्थानी आहे.