पॅरिस - रोलँड गॅरोस येथे झालेल्या फ्रेंच ओपन 2021 पुरुष एकेरी अंतिम सामन्यात नोवाक जोकोव्हिचने स्टेफानोस त्सित्सिपासचा पराभव करत दुसऱ्यांदा १९ वे ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकले.
नोवाक जोकोव्हिचने पटकावलं फ्रेंच ओपन स्पर्धेचे जेतेपद
जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या नोवाक जोकोव्हिचने फ्रेंच ओपन फायनलमध्ये स्टेफानोस त्सित्सिपासला ६-७ (६), २-६, ६-३, ६-२, ६-४ अशा फरकाने हरवून विजेतेपद मिळविले आहे. सामन्यात सुरूवातीला स्टेफानोसने पहिल्या दोन सेटमध्ये बाजी मारली. मात्र तिसऱ्या सेटपासून जोकोव्हिचने आक्रमक खेळी करत आपल्या अनुभवाच्या जोरावर पुढील तिन्ही सेट ६-३, ६-२, ६-४ अशा फरकाने जिंकले.
जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या नोवाक जोकोव्हिचने फ्रेंच ओपन फायनलमध्ये स्टेफानोस त्सित्सिपासला ६-७ (६), २-६, ६-३, ६-२, ६-४ अशा फरकाने हरवून विजेतेपद मिळविले आहे. सामन्यात सुरूवातीला स्टेफानोसने पहिल्या दोन सेटमध्ये बाजी मारली. मात्र तिसऱ्या सेटपासून जोकोव्हिचने आक्रमक खेळी करत आपल्या अनुभवाच्या जोरावर पुढील तिन्ही सेट ६-३, ६-२, ६-४ अशा फरकाने जिंकले. चार तासापेक्षा जास्त चाललेल्या या थरारक सामन्यात जोकोव्हिचने त्सित्सिपासला हरवत दुसऱ्यांदा विजेते पद मिळवले आहे. उपांत्य फेरीत राफेल नदालचा ३-६, ६-३, ७-६ (४), ६-२ असा पराभव करत जोकोव्हिचने आपले नाव अंतिम सामन्यात नमूद केले होते.
हेही वाचा - 'या' तारखेपासून सुरू होणार आयपीएलचे उर्वरित सामने, अंतिम सामना १५ ऑक्टोबरला