नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियाचा स्टार टेनिसपटू निक किर्गिओसने गरजूंना अन्न देण्याचे आश्वासन पूर्ण केले आहे. किर्गिओसने आपल्या इंस्टाग्रामवर खाद्यपदार्थाच्या बॉक्सचा फोटो पोस्ट केला. “खाद्यपदार्थांचे वितरण प्रगतीपथावर आहे”, असे त्याने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
प्रशंसनीय!.. ऑस्ट्रेलियाचा टेनिसस्टार करतोय गरजू लोकांची मदत
किर्गिओसने गेल्या आठवड्यातच सोशल मीडियावर एक संदेश दिला होता. कोरोना व्हायरसपासून उद्भवलेल्या परिस्थितीत भुकेलेल्यांना अन्न पुरवण्याची जबाबदारी त्याने स्वीकारली होती.
किर्गिओसने गेल्या आठवड्यातच सोशल मीडियावर एक संदेश दिला होता. कोरोना व्हायरसपासून उद्भवलेल्या परिस्थितीत भुकेलेल्यांना अन्न पुरवण्याची जबाबदारी त्याने स्वीकारली होती.
“जर कोणी काम करत नसेल आणि पैसे कमवू शकत नसेल, ज्याकडे अन्नाची कमतरता असेल, तर ही वेळ कठीण आहे. कृपया रिकाम्या पोटी झोपू नका. मला संदेश देण्यास अजिबात संकोच करू नका. मी जेवढं करू शकेन तेवढं करेन. मी तुमच्या घरी खाद्यपदार्थ पोच करेन. कोणताही प्रश्न विचारला जाणार नाही”, असे किर्गियोसने पोस्टमध्ये म्हटले होते.