महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

रशियन टेनिससुंदरीने शेअर केला स्वत: चा फोन नंबर, चाहत्यांची उडाली झुंबड!

शुक्रवारी शारापोव्हाने तिच्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ ट्विट केला. ज्यामध्ये तिने आपला नंबर शेअर केला आहे. प्रत्येकाला शारीरिक अंतर ठेवावे लागेल. अशा परिस्थितीत मी तुमच्यात सामील होण्याचा विचार करत आहे. यापूर्वी मी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तुमच्याशी संबंधित होते, तेव्हा माझा अनुभव खूप चांगला होता. म्हणून मी आपला नंबर आपल्या सर्वांसह शेअर करत आहे. तुम्ही मला संदेश पाठवा. मी तुम्हाला प्रत्युत्तर देईन, असे शारापोव्हाने व्हिडिओत सांगितले.

By

Published : Apr 7, 2020, 8:08 PM IST

Maria Sharapova shared her number on twitter
रशियन टेनिससुंदरीने शेअर केला स्वत: चा फोन नंबर, चाहत्यांची उडाली झुंबड!

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसमुळे अनेक खेळाडू आपला वेळ घरीच घालवत आहेत. टेनिसविश्वापासून नुकतीच दूर झालेली रशियाची मारिया शारापोव्हासुद्धा घरीच आहे. मात्र, ती घरात इतकी कंटाळली की हा कंटाळा घालवण्यासाठी तिने आपला मोबाइल नंबर चाहत्यांसह शेअर केला. त्यानंतर, चाहत्यांनी संपर्क साधण्यासाठी तिच्या मोबाईलच्या ‘इनबॉक्स’मध्ये मोठी गर्दी केली.

शुक्रवारी शारापोव्हाने तिच्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ ट्विट केला. ज्यामध्ये तिने आपला नंबर शेअर केला आहे. प्रत्येकाला शारीरिक अंतर ठेवावे लागेल. अशा परिस्थितीत मी तुमच्यात सामील होण्याचा विचार करत आहे. यापूर्वी मी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तुमच्याशी संबंधित होते, तेव्हा माझा अनुभव खूप चांगला होता. म्हणून मी आपला नंबर आपल्या सर्वांसह शेअर करत आहे. तुम्ही मला संदेश पाठवा. मी तुम्हाला प्रत्युत्तर देईन, असे शारापोव्हाने व्हिडिओत सांगितले.

त्यानंतर, शारापोव्हाला असंख्य चाहत्यांनी संदेश पाठवला. तिने सांगितले, की या व्हिडिओला ४० तासात २२ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. २००४मध्ये मारियाने विम्बल्डन स्पर्धेचे जेतेपद मिळवले होते. तेव्हा तिचे वय अवघे १७ वर्ष होते. २००८मध्ये वयाच्या २०व्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपनचे तर, २०१४मध्ये फ्रेंच ओपन जेतेपद पटकावले होते. गेल्या महिन्यात मारिया आपली शेवटची ग्रँडस्लॅम स्पर्धा खेळली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details