पॅरिस - दिग्गज महिला टेनिसपटू आणि विजेतेपदाची प्रबळ दावेदार असलेली रोमानियाची सिमोना हालेप फ्रेंच ओपनमधून बाहेर पडली आहे. एका वृत्तानुसार, चौथ्या फेरीत पोलंडची १९ वर्षाची इगा स्वितेकने हालेपला ६-१, ६-२ अशा सरळ सेटमध्ये मात दिली. जागतिक क्रमवारीत स्वितेक ५८व्या स्थानी आहे.
फ्रेंच ओपन : १९ वर्षाच्या टेनिसपटूकडून हालेप स्पर्धेबाहेर
पोलंडची १९ वर्षाची इगा स्वितेकने हालेपला ६-१, ६-२ अशा सरळ सेटमध्ये मात दिली. स्वितेकने कारकीर्दीत प्रथमच ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
स्वितेकने कारकीर्दीत प्रथमच ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत आता स्वितेकचा सामना इटलीच्या मार्टिना ट्रेव्हिसनशी होणार आहे. या विजयामुळे स्वितेकने पराभवाचा बदला घेतला. गेल्या वर्षी याच स्पर्धेत हालेपने स्वितेकला ६-१, ६-० ने पराभूत केले होते.
स्वितेकने आपल्या पहिल्या फेरीच्या सामन्यात मार्केटा वोंड्रोसाचा पराभव केला. तिने चौथ्या फेरीपर्यंत एकही सेट गमावला नाही. एगनिएस्का रदवांस्कानंतर फ्रेंच ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचणारी पोलंडची ती पहिली पहिली महिला टेनिसपटू आहे. रदवांस्काने २०१३मध्ये स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती.