महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

विश्वविजेता धावपटू क्रिस्टियन कोलमनचे निलंबन

जागतिक अ‍ॅथलेटिक्स अँटी-डोपिंग नियमांनुसार किंवा इंटीग्रिटी युनिटच्या आचारसंहितेअंतर्गत अंतिम सुनावणी होईपर्यंत त्याच्यावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. ''डोपिंग परीक्षकांच्या केवळ फोन कॉलमुळे त्यांच्या राहण्याच्या जागेविषयी गैरसमज दूर होऊ शकत होता. ज्यामुळे त्याला निलंबनाचा धोका होता'', असे यापूर्वी कोलेमनने म्हटले होते.

By

Published : Jun 19, 2020, 4:38 PM IST

World 100m champion christian coleman suspended after third missed drugs test
विश्वविजेता धावपटू क्रिस्टियन कोलमनचे निलंबन

नवी दिल्ली -अ‍ॅथलेटिक्स इंटिग्रिटी युनिटच्या (एआययू) तिसर्‍या डोपिंग चाचणीसाठी अयशस्वी ठरल्यानंतर 100 मीटर विश्वविजेता धावपटू क्रिस्टियन कोलमनला बुधवारी निलंबित करण्यात आले. एआययूने तात्पुरते निलंबित असलेल्या खेळाडूंची यादी प्रसिध्द केली आहे, ज्यात अमेरिकेच्या 24 वर्षीय कोलमनचे नाव आहे.

जागतिक अ‍ॅथलेटिक्स अँटी-डोपिंग नियमांनुसार किंवा इंटीग्रिटी युनिटच्या आचारसंहितेअंतर्गत अंतिम सुनावणी होईपर्यंत त्याच्यावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. ''डोपिंग परीक्षकांच्या केवळ फोन कॉलमुळे त्यांच्या राहण्याच्या जागेविषयी गैरसमज दूर होऊ शकत होता. ज्यामुळे त्याला निलंबनाचा धोका होता'', असे यापूर्वी कोलेमनने म्हटले होते.

कोलमनने ट्विटरवर तिसर्‍यांदा डोपिंग चाचणी न करण्याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. तो म्हणाला, ''9 डिसेंबरला चाचणी देण्याची वेळ होती. गेल्या 12 महिन्यांतील ही तिसरी वेळ होती, परंतु मी यावेळीही चाचणीला उपलब्ध होऊ शकलो नाही.'' यापूर्वी, तो 16 जानेवारी 2019 आणि 26 एप्रिल 2019 रोजीच्या चाचणीला येऊ शकला नव्हता.''

ABOUT THE AUTHOR

...view details