नवी दिल्ली : फिफा विश्वचषक ( FIFA World Cup 2022 ) स्पर्धेतील 8 विजेत्यांपैकी 6 विश्वविजेते असे ( 6 World Champions Out of 8 Winners of FIFA World Cup ) आहेत, ज्यांनी आपल्या भूमीवर आणि मातृभूमीवर खेळताना विजयाचा झेंडा ( Hoisted The Flag of Victory Playing on Their Land ) फडकावला ( When and How FIFA Organizers Become Champions ) आहे. यामध्ये ( FIFA World Cup 2022 Schedule ) सर्वाधिक जेतेपद पटकावणारा ब्राझील हा एकमेव देश आहे, ज्याने आपल्याच देशात खेळताना एकही विजेतेपद पटकावलेले नाही. तर दुसरा देश स्पेन आहे. जो केवळ 1982 मध्ये मायदेशात दुसरी फेरी गाठू शकला ( Many Countries Tried to See Performance on Home Grounds ) होता.
आपल्याच मातृभूमीवर अथवा घरचा मैदानावर जेतेपद मिळवणारे संघ :सर्वाधिक फिफाचे जेतेपद पटकावणाऱ्या ब्राझीलला आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोर कधीही विजेतेपद मिळवता आलेले नाही. 1950 मध्ये मायदेशातील अंतिम सामना ब्राझीलने गमावला आणि उपविजेता ठरला. यानंतर 2014 मध्येही ब्राझीलला जर्मनीविरुद्धच्या उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला होता. जेव्हा यजमान चॅम्पियन बनले, तेव्हा यजमान राष्ट्र म्हणून खेळून इंग्लंडने 1966 मध्ये त्यांचे एकमेव फिफा विजेतेपद जिंकले. त्याआधी उरुग्वेने 1930 मध्ये, इटलीने 1934 मध्ये हा पराक्रम केला होता. अर्जेंटिनाने 1978 मध्ये आणि फ्रान्सने 1998 मध्ये यजमान देश म्हणून पहिले विजेतेपद जिंकले आणि त्यांच्या देशाला फिफा विश्वचषक भेट दिला. तर जर्मनीने 1974 मध्ये घरच्या भूमीवर दुसरे विजेतेपद पटकावले.
इतर अनेक देशांचा घरच्या मैदानावर चांगला परफाॅर्मन्स : इतर राष्ट्रांनीही त्यांच्या भूमीवर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या फिफासारख्या मोठ्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करताना बऱ्यापैकी यश मिळवले आहे. स्वित्झर्लंडने 1954 मध्ये उपांत्यपूर्व फेरीपर्यंतचा प्रवास केला होता. त्यामुळे 1958 मध्ये स्वीडन त्यांच्या देशात उपविजेता म्हणून उदयास आला. 1962 मध्ये घरच्या मैदानावर खेळत चिलीने तिसरे स्थान पटकावले होते. तर 2002 मध्ये दक्षिण कोरियाने आपल्या देशात चौथे स्थान मिळवण्यात यश मिळवले होते. मेक्सिकोने 1970 आणि 1986 मध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. या सर्व देशांना त्यांच्या देशात खेळताना त्यांच्या काळातील सर्वोत्तम स्थान मिळाले.