मुंबई - ऑलिम्पिक स्पर्धा म्हटले की, क्रीडा क्षेत्रातील जगातला सर्वांत मोठा कुंभमेळा म्हणता येईल. अशा कुंभमेळ्याला उद्या शुक्रवारपासून जपानच्या टोकियोमध्ये सुरूवात होत आहे. टोकियो ऑलिम्पिकचा उद्धाटन सोहळा इंटरनॅशनल स्टेडियममध्ये होणार असून आयोजकांनी कोरोनाचा संसर्गाचा धोका पाहता सर्व देशातील खेळाडूंची संख्या उद्धाटन सोहळ्यासाठी कमी केली आहे.
काही महत्वाच्या बाबी -
- उद्या 23 जुलै रोजी भारताचे दोन सामने होणार आहेत.
- सकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी महिला एकेरी पात्रता फेरीत दीपिका कुमारी हिचा सामना आहे.
- सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी पुरूष एकेरी पात्रता फेरीत अतानु दास, प्रविण जाधव, तरुणदीप राय यांचे सामने होणार आहे.
- टोकियो ऑलिम्पिकचे उद्धाटन स्थानिक वेळेनुसार रात्री 8 वाजता तर भारतीय वेळेनुसार सायंकाळी 4 वाजून 30 मिनिटांनी होणार आहे.
- उद्धाटन सोहळ्यात सर्व देशाचे खेळाडू आणि संघ सहभागी होणार आहेत.
- टोकियो ऑलिम्पिकचे थेट प्रसारण जगातील 204 देशांमध्ये केलं जाणार आहे.
- उद्धाटन सोहळ्यात मार्च पास्ट हा जपानी वर्णमालेनुसार होणार आहे. यानुसार भारताचा नंबर 21 वा आहे.
- स्टेडियम, मुख्य ट्रॅक आणि फिल्ड कार्यक्रमासह महिला फुटबॉलमध्ये देखील सुवर्णपदकासाठी स्पर्धा रंगणार आहे.
- टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी देश किमान निर्धारित अॅथलेटिक्संना उद्धाटन सोहळ्यासाठी पाठवतील.
- ऑस्ट्रेलिया 50 तर ग्रेट ब्रिटन संघासाठी 30 जणांची मर्यादा ठेवण्यात आली आहे.