महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

टायगर श्रॉफ यंदाच्या टाटा मुंबई मॅरेथॉनचा 'फेस ऑफ इव्हेंट'

दरवर्षी जानेवारी महिन्यातील तिसऱ्या आठवड्यात मुंबई मॅरेथॉनचे आयोजन केले जाते. २०२० च्या १७ व्या टाटा मुंबई मॅरेथॉनचे आयोजन रविवारी १९ जानेवारीला करण्यात येणार आहे.

टायगर श्रॉफ यंदाच्या टाटा मुंबई मॅरेथॉनचा 'फेस ऑफ इव्हेंट'

By

Published : Nov 8, 2019, 1:24 PM IST

मुंबई -बॉलिवूडचा सध्याच्या घडीचा आघाडीचा अभिनेता टायगर श्रॉफची यंदाच्या टाटा मुंबई मॅरेथॉनचा 'फेस ऑफ इव्हेंट' म्हणून निवड झाली आहे. प्रोकॅम इंटरनॅशनलने टायगरच्या नावाची घोषणा केली.

हेही वाचा -क्रिकेटसाठी कायपण..! स्वतःच्या लग्नात पाहिला क्रिकेट सामना, आयसीसीने शेअर केला फोटो

दरवर्षी जानेवारी महिन्यातील तिसऱ्या आठवड्यात मुंबई मॅरेथॉनचे आयोजन केले जाते. २०२० च्या १७ व्या टाटा मुंबई मॅरेथॉनचे आयोजन रविवारी १९ जानेवारीला करण्यात येणार आहे. खुल्या १० के चॅरिटी रनिंगसाठी ऑनलाइन नोंदणी १० डिसेंबर २०१९ पर्यंत किंवा संपूर्ण जागा भरेपर्यंत तर, महिलांसाठी ऑनलाइन नोंदणी २९ नोव्हेंबर २०१९ पर्यंत किंवा संपूर्ण जागा भरेपर्यंत सुरू राहणार आहे.

आशियातील महत्वाची मॅरेथॉन म्हणून ओळख असलेल्या मुंबई मॅरेथॉनमध्ये ५० हजारांहून अधिक लोक सहभाग नोंदवतात.

ABOUT THE AUTHOR

...view details