नवी दिल्ली -क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांनी सोमवारी ‘पेन्शनर्स टू मेरिटोरियस स्पोर्ट्सपर्सन’ योजनेंतर्गत खेळाडूंना आजीवन मासिक निवृत्तीवेतन जाहीर केले. रिजीजू यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली.
हेही वाचा -"भारतीय खेळाडूंचं वागणं चुकीचं", देशाच्या माजी क्रिकेटपटूनं फटकारलं
'जे खेळाडू भारतीय नागरिक आहेत आणि ऑलिम्पिक खेळ, राष्ट्रकुल खेळ, आशियाई खेळ आणि विश्वचषक / जागतिक स्पर्धेत (ऑलिम्पिक व एशियन गेम्समध्ये) आणि पॅरालिम्पिक खेळांमध्ये पदके जिंकली आहेत त्यांना आजीवन मासिक निवृत्तीवेतन मिळणार आहे. यासाठी वयोमर्यादा ३० वर्षे किंवा सक्रिय क्रीडा सेवानिवृत्त असे आहे', असे रिजीजू यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
'सध्या या योजनेंतर्गत ६२७ खेळाडूंना आजीवन मासिक निवृत्तीवेतन १२,००० रुपयांपासून ते २०,००० रुपयांपर्यंत मिळते', असेही रिजीजू म्हणाले आहेत.