कोल्हापूर - राजधानी दिल्ली येथे सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत कोल्हापूरच्या राही सरनोबतने पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत रौप्यपदकाची कमाई केली आहे. 25 मीटर पिस्तुल प्रकारात तिने रौप्य पदकावर आपले नाव कोरले आहे. मागच्यावर्षीसुद्धा राही सरनोबतने सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले होते. त्यामुळे राहीच्या कुटुंबासह जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा -राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, चर्चा मात्र होणार सरकारवर झालेल्या आरोपाची?
आजपर्यंत 100 हून अधिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पदके
कोल्हापूरच्या रांगड्या मातीतील राही सरनोबत गेल्या अनेक वर्षांपासून 25 मीटर पिस्तुल प्रकारात आपलं नाव करत आली आहे. तिने आपल्या दमदार कामगिरीने आजपर्यंत राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 100 हून अधिक पदकांवर आपले नाव कोरले आहे. राही सध्या टोकियो ऑलम्पिकसाठी सराव करत आहे. त्यातच आता दिल्ली येथे सुरू असलेल्या विश्वचषक 2021 स्पर्धेत तिने रौप्य पदकाची कमाई केल्याने तिचा आत्मविश्वास आणखीन वाढला आहे. राहीच्या रौप्य पदकाच्या कमाईनंतर तिच्या घरात आनंद साजरा केला जात असून तिला पुढच्या स्पर्धांसाठीसुद्धा कोल्हापूरकर शुभेच्छा देत आहेत.
three shooters won the medals
हेही वाचा -शिखर धवन 'इतक्या' वेळा ठरला 'नर्व्हस नाईंटीज'चा शिकार
पहिल्यांदाच विश्वचषक स्पर्धेत तिन्ही पदके भारताकडे -
25 मीटर पिस्तुल प्रकारात पहिल्यांदाच तिन्ही पदके भारताला मिळाली आहेत. यावर्षी चिंकी यादव यांना सुवर्णपदक, राही सरनोबत रौप्यपदक तर मनू भाकेर यांना कांस्यपदक मिळाले आहे.