महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 9, 2020, 11:00 PM IST

ETV Bharat / sports

मेरी कोम टोकियो ऑलिम्पिकसाठी ठरली पात्र

सहा वेळा विश्वविजेती भारतीय बॉक्सिंगपटू एमसी मेरी कोम टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे.

MC Mary Kom defeats Irish Magno 5-0 to secure Tokyo Olympics berth
मेरी कोम टोकियो ऑलिम्पिकसाठी ठरली पात्र

अम्मान (जॉर्डन) - भारताचा पुरुष बॉक्सिंगपटू अमित पांघल पाठोपाठ सहा वेळा विश्वविजेती, भारताची महिला बॉक्सिंगपटू एमसी मेरी कोम टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे. तिने आज (सोमवार) आशियाई ऑलिम्पिक पात्रता बॉक्सिंग स्पर्धेत फिलिपाइन्सच्या इरिश मॅग्नोचा पराभव करत ऑलिम्पिकचे तिकिट पक्के केले. ती ५१ किलो वजनी गटात भारतासाठी ऑलिम्पिक खेळेल.

आशियाई ऑलिम्पिक पात्रता बॉक्सिंग स्पर्धेत मेरी कोमने उपांत्यपूर्व सामन्यात मॅग्नोशीचा पराभव केला. तिने ही लढत ५-० ने जिंकली. या विजयासह ती ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली.

दरम्यान, ३७ वर्षीय मेरी कोमने न्यूझीलंडच्या टॅमिन बेन्नीचा ५-० असा धुव्वा उडवत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. या विजयानंतर तिने सुरुवातीपासूनच मी आक्रमकतेची आखलेली रणनिती फलदायी ठरली. माझ्या कामगिरीबाबत मी समाधानी आहे, अशी प्रतिक्रिया दिली होती.

मेरी कोमच्या आधी आज भारताचा बॉक्सिंगपटू अमित पांघलने टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला. अमितने आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवला. ५२ किलो वजनी गटाच्या सामन्यात अमितने फिलीपाईन्सच्या कार्लो पालमला ४-१ अशी मात दिली.

तत्पूर्वी, भारताची उदयोन्मुख महिला बॉक्सर साक्षी चौधरी ५७ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाली. साक्षीला दक्षिण कोरियाच्या एजी इमने ०-५ अशी मात दिली. या पराभवामुळे साक्षीचे टोकियो ऑलिम्पिक तिकिट हुकले.

हेही वाचा -नाशकात निर्भया मॅरेथॉन; अजिंक्य रहाणे, रिंकू राजगुरू यांच्यासह विश्वास नागरे-पाटलांची हजेरी

हेही वाचा -पहिल्या ऑलिम्पिकवारीसाठी स्टार बॉक्सर अमित पांघल सज्ज

ABOUT THE AUTHOR

...view details