महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा : खुब लडी मर्दानी!..मेरी कोमचा उपांत्यफेरीत पराभव

या स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात मेरीला पराभव स्विकारावा लागला असला तरी तिचे कांस्यपदक निश्चित झाले आहे. दुसऱ्या सीडेड कारिकोग्लूने मेरी विरूद्ध संयमी सुरूवात केली होती. पहिल्या फेरीत बचावात्मक खेळणाऱ्या मेरीने दुसऱ्या फेरीत आक्रमण केले. मात्र, कारिकोग्लूने  तिला कोणतीही आघाडी घेऊ दिली नाही. मेरीने कारिकोग्लूला अनेक वेळा रिंग जवळ नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही खेळाडूंना कोणतेही यश मिळाले नाही.

By

Published : Oct 12, 2019, 12:43 PM IST

जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा : खुब लडी मर्दानी!..मेरी कोमचा उपांत्यफेरीत पराभव

उलान-उदे (रशिया) -सहा वेळा जगज्जेती असलेली भारताची महिला बॉक्सिंगपटू मेरी कोमचे जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. ५१ किलो वजनी गटातील उपांत्य सामन्यात मेरीला तुर्कीच्या बुसेनांज कारिकोग्लूकडून ४-१ ने पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे ५१ किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवण्याचे तिचे स्वप्न धुळीस मिळाले.

हेही वाचा -अ‌ॅशेसमध्ये फ्लॉप ठरलेल्या वॉर्नरचे दमदार शतक

या स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात मेरीला पराभव स्वीकारावा लागला असला तरी तिचे कांस्यपदक निश्चित झाले आहे. दुसऱ्या सीडेड कारिकोग्लूने मेरी विरूद्ध संयमी सुरुवात केली होती. पहिल्या फेरीत बचावात्मक खेळणाऱ्या मेरीने दुसऱ्या फेरीत आक्रमण केले. मात्र, कारिकोग्लूने तिला कोणतीही आघाडी घेऊ दिली नाही. मेरीने कारिकोग्लूला अनेक वेळा रिंग जवळ नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही खेळाडूंना कोणतेही यश मिळाले नाही.

अटीतटीच्या तिसऱ्या फेरीत मात्र, कारिकोग्लूने दमदार सुरूवात केली. उत्कृष्ठ जॅब आणि हुकच्या आधारावर तिने मेरीविरुद्ध गुण मिळवले. बाऊट संपल्यानंतर, पाचही सदस्यांनी २८-२९, ३०-२७, २९-२८, २९-२८, ३०-२७ असे गुण दिले. या गुणांच्या आधारावर कारिकोग्लूला विजयी घोषित करण्यात आले. ४८ किलो वजनी गटात मेरीने सहा वेळा विजेतेपद पटकावले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details