रांची - झारखंडच्या 'अल्बर्ट अॅक्वा' खो खो स्टेडियम येथे खेळल्या गेलेल्या सब ज्युनियर राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने चमकदार कामगिरी केली. किशोर गटात महाराष्ट्राने विजेतेपद पटकावले असून मुलींमध्ये महाराष्ट्राच्या संघाला उपविजेतेपद मिळाले आहे.
हेही वाचा -VIDEO : रोहितने सांगितले शमीचे रहस्य, बिर्याणी मिळाली तर...तो
किशोर-किशोरी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्र आणि ओडिसा संघाने स्थान मिळवले होते. किशोर गटात महाराष्ट्राने ओडिसा संघाचा आठ गुण आणि एका डावाने पराभव केला. तर मुलींमध्ये ओडिसा संघाने गतविजेत्या महाराष्ट्राला सात गुणांनी हरवत विजेतेपद पटकावले.
यजमानपद मिळालेल्या झारखंडच्या संघाने मुलींमध्ये चौथे स्थान मिळवले आहे. तर, कर्नाटक संघाला तिसरे स्थान मिळाले आहे. मुलांमध्ये उत्तर प्रदेशच्या संघाने तिसरे आणि आंध्र प्रदेशने चौथे स्थान मिळवले आहे. उस्मानाबादच्या रमेश वसावेला सर्वोत्कृष्ट पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याला भरत पुरस्काराने तर किशोरींमध्ये ओडिसाच्या अनन्या प्रधानला एकलव्य पुरस्काराने गौरवण्यात आले.