महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या उत्साहावर पावसाचे पाणी; मैदानाचे नुकसान

यंदा 64 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा साताऱ्यात होत आहे. आज ( शुक्रवार ) दुपारच्या सत्रात अवकाळी पावसामुळे कोणतेही सामने होऊ शकले ( Maharashtra Kesari ) नाही.

By

Published : Apr 8, 2022, 10:55 PM IST

Maharashtra Kesari
Maharashtra Kesari

सातारा -यंदा 64 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा साताऱ्यात होत आहे. आज ( शुक्रवार ) दुपारच्या सत्रात अवकाळी पावसामुळे कोणतेही सामने होऊ शकले नाही. अवकाळी पावसाने कुस्ती आखाड्याची दुर्दशा झाली असून मैदानावर पाणी साठले आहे. त्याच बरोबर विजेची व्यवस्था करण्यात आलेले खांबही खाली पडले. यामुळे आज दुपारनंतरचे सामने स्थगित करण्यात ( Maharashtra Kesari ) आले.

मातीच्या आखाड्यात पाणी - दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरु झाला. साताऱ्यातील छत्रपती शाहू स्टेडियमवर मॅट आणि मातीवरचा आखाडा उभारलेला आहे. कुठलीही छत, ताडपत्री टाकण्याची संधी न देताच अचानक पाऊस सुरू झाल्याने मैदानावर पाणी साठले. त्याचबरोबर आखाड्याभोवती विद्युत यंत्रणा उभारण्यासाठी केलेली लोखंडी व्यवस्था ढासळली. त्यामुळे मातीच्या आखाड्यात ही पाणी साठल्याने तेथेही कुस्त्या होऊ शकणार नाही, अशी अवस्था निर्माण झाली. दुपारचे सामने रद्द करण्यात आल्याचे निवेदन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी प्रसिद्धीला दिले आहे.

महाराष्ट्र केसरी मैदानावर पाणी

आजचे सामने उद्यावर - पूर्व नियोजनाप्रमाणे उद्या ( शनिवारी ) संध्याकाळी महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना होणार होता. आजची परिस्थिती उद्या अशीच कायम राहिली तर महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यावर पावसाचे सावट नक्कीच असणार आहे हे उघड आहे. आत्ता सध्या मैदान दुरुस्तीचे काम सुरु आहे. त्यामुळे स्थगित करण्यात आलेले सामने उद्या (दि. ९) सकाळी आठ वाजता कोणत्याही परिस्थितीत सुरू होतील, अशी माहिती सातारा जिल्हा तालीम संघाचे सचिव सुधीर पवार यांनी दिली. महाराष्ट्र केसरीच्या अंतिम विजेत्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते बक्षीस व चांदीची गदा देण्यात येणार आहे.

हेही वाचा -Spinner Yuzvendra Chahal : आयपीएल 2013 मध्ये चहलसोबत घडला होता भयानक प्रसंग; या कारणामुळे चहल लटकला होता बाल्कनीत

ABOUT THE AUTHOR

...view details