चेन्नई: भारताचा महान बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद ( Indias greatest chess player Viswanathan Anand ) याची रविवारी खेळाच्या जागतिक प्रशासकीय मंडळ FIDE चे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्याच वेळी, आउटगोइंग अध्यक्ष आर्काडी व्होर्कोविच ( Outgoing President Arkady Vorkovich ) दुसऱ्या टर्मसाठी पुन्हा अध्यक्ष म्हणून निवडले गेले. पाच वेळचा विश्वविजेता आनंद हा व्होर्कोविचच्या संघाचा भाग होता.
Chess Player Viswanathan Anand : FIDE चे उपाध्यक्ष म्हणून विश्वनाथन आनंद यांची नियुक्ती
आउटगोइंग अध्यक्ष अर्काडी व्होर्कोविच दुसऱ्यांदा अध्यक्षपदी निवडून आले. त्याचबरोबर उपाध्यक्ष पदी विश्वनाथन आनंदची नियुक्ती करण्यात ( Anand FIDE became Vice President ) आली.
विश्वनाथन आनंद
व्होर्कोविच यांना 157 मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी आंद्रेई बरिशपोलेट्स ( Andrei Barishpolets ) यांना केवळ 16 मते मिळाली. एक मत अवैध ठरले तर पाच सदस्यांनी मतदानात भाग घेतला नाही. 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड (44th Chess Olympiad )दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या बुद्धिबळाच्या जागतिक संस्थेच्या FIDE काँग्रेस दरम्यान या निवडणुका घेण्यात आल्या.