नवी दिल्ली -आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) टोकियो ऑलिम्पिकसाठी आंतरराष्ट्रीय शूटिंग स्पोर्ट फेडरेशनच्या (आयएसएसएफ) नवीन पात्रता प्रणालीला मान्यता दिली आहे. त्यामुळे भारतीय नेमबाजांचा कोटा 16 पर्यंत वाढू शकेल. याआधी हा आकडा 15 असा होता.
आयएसएसएफची नवीन पात्रता प्रणाली मान्य, भारतीय नेमबाजांना होणार फायदा
एका वृत्तसंस्थेनुसार, आयओसी कार्यकारी मंडळाने शूटिंगसाठी नवीन टोकियो ऑलिम्पिक पात्रता प्रणालीस मान्यता दिली आहे. 12 कोटाचे वाटप (प्रत्येक कार्यक्रमासाठी एक कोटा) 31 मार्च 2020 पर्यंतच्या जागतिक क्रमवारीच्या यादीच्या आधारे केले जाईल. टोकियो 2020 पात्रतेसाठी 6 जून 2021 ची नवीन मुदत आहे.

क्रमवारीच्या आधारे 12 कोटा देण्यात येतील. या नियमांतर्गत भारताला आणखी एक कोटा मिळू शकेल. यावर्षी 24 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान टोकियो ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात येणार होते. मात्र, कोरोनामुळे ऑलिम्पिक एका वर्षासाठी पुढे ढकलले गेले आहे. ही स्पर्धा 23 जुलै ते 8 ऑगस्ट 2021 दरम्यान खेळवली जाईल.