नवी दिल्ली:भारत ५ जानेवारी रोजी श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात मालिका जिंकण्याच्या इराद्याने प्रवेश करणार आहे. (IND vs SL T20 ) पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा दोन धावांनी पराभव (India vs Sri Lanka second T20 ) करून भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. (Ind vs Sl 2nd T20 Update) मंगळवारच्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा २ धावांनी पराभव केला आहे. (Deepak Hooda ) गेल्या सामन्यात भारताने २० षटकात ५ विकेट गमावत १६२ धावा केले होते.
१६२ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संपूर्ण संघ २० षटकांत १६० धावांत गारद झाला. भारताचा वेगवान ( Ind vs Sl 2nd T20 in Pune ) गोलंदाज शिवम मावीने आपल्या पहिल्याच सामन्यात शानदार गोलंदाजी करत ४ बळी घेतले आहे. हर्षल, अक्षर आणि उमरान मलिक यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. दीपक हुडा हा एक महान फलंदाज होता आणि त्याने ४१ धावांची शानदार खेळी खेळली आहे, ज्यामुळे त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले आहे.
शुभमन, ऋतुराजला मिळू शकते संधी : शुभमन गिलला श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. हा त्याचा पदार्पणाचा सामना होता, पण त्यात त्याला आपली छाप सोडता आली नाही. त्यामुळे दुसऱ्या टी-२० मध्ये खेळणे त्याच्यासाठी अवघड असून त्याच्या जागी ऋतुराज गायकवाडला संघात स्थान मिळू शकणार आहे, असे मानले जात आहे. ऋतुराजने टीम इंडियासाठी आतापर्यंत 9 टी-२० सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने केवळ ३५ धावा केल्या आहेत आणि १ अर्धशतक झळकावले आहे. ऋतुराजने आयर्लंड दौऱ्यावर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली शेवटचा टी-२० सामना खेळला होता.
हेड टू हेड: भारत आणि श्रीलंका क्रिकेट संघामध्ये आतापर्यंत २७ टी-२० सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारताने १८ सामने जिंकले आहेत, तर श्रीलंकेने ८ सामने जिंकले आहेत. एका सामन्याचा निकाल नाही. २०२२ मध्ये दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांची मालिका खेळवण्यात आली होती. तो भारतीय संघाने ३-० ने जिंकला. भारताचा संघ: हार्दिक पंड्या (कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, दीपक हुडा, अक्षर पटेल, हर्षल पटेल, शिवम मावी, उमरान मलिक, युझवेंद्र चहल श्रीलंकेचा संघ: दासून शनाका (क), पथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), धनंजया डी सिल्वा, भानुका राजपक्षे, चरित अस्लंका, वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, महेश थिक्शाना, कसून राजिथा, दिलशान मदुशानका.