अॅमस्टेलवीन :महिला हॉकी विश्वचषकात भारताच्या पहिल्या विजयाची प्रतीक्षा संपलेली नाही. ब गटातील त्यांच्या दुसऱ्या सामन्यात त्यांनी चीनसोबत बरोबरी साधली. मंगळवारी (5 जुलै) नेदरलँड्समधील अॅमस्टेलवेन येथे दोन्ही संघांनी प्रत्येकी एक गोल केला. त्यामुळे सामना 1-1असा बरोबरीत ( India-China match draw ) सुटला. भारताला पहिल्या सामन्यात ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या इंग्लंडविरुद्ध 1-1 अशी बरोबरी साधावी लागली होती. चीनविरुद्धच्या सामन्यात वंदना कटारियाने गोल ( Vandana Kataria scored against China ) केला. वंदनानेही इंग्लंडविरुद्ध गोल करत टीम इंडियाला पराभवापासून वाचवले.
भारतीय संघ पराभवातून वाचला असेल, पण त्याची कामगिरी निराशाजनकच म्हणावी लागेल. या क्रमवारीत टीम इंडिया 8व्या तर चीन 13व्या स्थानावर आहे. या सामन्यात भारत आणखी गोल करेल अशी अपेक्षा होती, मात्र चीनने बरोबरी ठेवली. आता टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध मोठा विजय मिळवावा लागणार ( India need big win against NZ ) आहे. हा सामना 7 जुलै रोजी होणार आहे. दोन्ही संघांमधील सामना बरोबरीत सुटला. भारत आणि चीनचा ताबा 50-50 टक्के होता. या सामन्यात भारताला पाच कॉर्नर मिळाले, मात्र एकच गोल करता आला. चीनने मैदानातून एकमेव गोल केला. सामना अनिर्णित राहिल्यानंतर भारताचे आता दोन गुण झाले आहेत. तो गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. चीनचेही दोन गुण असून ते पहिल्या स्थानावर आहे.