मुंबई:भारताला 2023 मध्ये बहरीन येथे होणाऱ्या एएफसी अंडर-17 ( AFC U-17 ) आशियाई चषक पात्रता फेरीसाठी सौदी अरेबिया, म्यानमार, मालदीव आणि कुवेत यांच्यासह डी गटात ठेवण्यात आले आहे. डी गटातील पात्रता फेरी 1ते 9 ऑक्टोबर दरम्यान सौदी अरेबियात खेळवली जाईल. सर्व 44 सहभागी देश 10 केंद्रीकृत पात्रता गटांमध्ये विभागले गेले आहेत, त्यापैकी सहा गटांमध्ये चार संघ असतील. तर चार गटात पाच संघ सहभागी होणार आहेत.
2017 एएफसी अंडर-17 फिफा विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भूषवणारा भारत या वर्षी ऑक्टोबरमध्ये महिलांच्या स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे, मंगळवारी क्वालालंपूर येथे झालेल्या ड्रॉनुसार पाच सदस्यांसह गटात आहे.
10 गट विजेते आणि पाच सर्वोत्तम द्वितीय क्रमांकाचे संघ अंतिम फेरीत बहरीनशी सामील होतील. तारखा अजून ठरायच्या आहेत. तीन वेळचा गतविजेता जपान यजमान जॉर्डन, सीरिया, फिलिपाइन्स आणि तुर्कमेनिस्तानसह ए गटात आहे. बी गटात यजमान इंडोनेशिया, मलेशिया, पॅलेस्टाईन, ग्वाम आणि यूएई यांचा समावेश आहे
संघ खालीलप्रमाणे आहेत:
- ग्रुप ए: जपान, जॉर्डन (एच), सीरिया, फिलीपिन्स आणि तुर्कमेनिस्तान.
- ग्रुप बी: इंडोनेशिया (एच), मलेशिया, पॅलेस्टाईन, ग्वाम आणि संयुक्त अरब अमिराती.
- ग्रुप सी: ओमान (एच), इराक, कतार, लेबनॉन आणि बहरीन.
- ग्रुप डी: भारत, सौदी अरेबिया (एच), म्यानमार, मालदीव आणि कुवेत.
- ग्रुप ई: येमेन, बांगलादेश (एच), सिंगापूर आणि भूतान.
- ग्रुप एफ: थायलंड, व्हिएतनाम (एच), चायनीज तैपेई आणि नेपाळ.
- ग्रुप जी: ऑस्ट्रेलिया (एच), चीन पीआर, कंबोडिया, एन मारियाना द्वीप.
- ग्रुप एच: ताजिकिस्तान (एचके), अफगाणिस्तान, तिमोर-लेस्टे आणि मंगोलिया.
- ग्रुप आय: आयआर इराण, हाँगकाँग, किर्गिझ प्रजासत्ताक (एच) आणि लाओस.
- ग्रुप जे: कोरिया प्रजासत्ताक, ब्रुनेई दारुसलाम, उझबेकिस्तान (एच) आणि श्रीलंका.