पॅरिस - आंतरराष्ट्रीय हँडबॉल फेडरेशनने (आयएएफ) पुढील वर्षी होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकच्या पात्रता स्पर्धेच्या तारखांची घोषणा केली आहे. तीन पुरुष आणि तीन महिला संघांची पात्रता स्पर्धा अनुक्रमे मार्च आणि एप्रिलमध्ये होणार होती.
हँडबॉल ऑलिम्पिक पात्रता तारखा जाहीर
परंतु कोरोना व्हायरसमुळे टोकियो ऑलिम्पिक एका वर्षासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. आता पुढच्या वर्षी ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत. त्यामुळे आयएचएफने पुन्हा एकदा त्याच्या स्पर्धांच्या तारखांमध्ये बदल केला आहे.

नव्या वेळापत्रकानुसार स्पेन, हंगेरी आणि माँटेनेग्रो या महिला पात्रता गटांचे यजमानपद कायम ठेवतील. पुढील वर्षी १९ ते २१ मार्च दरम्यान या स्पर्धेचे आयोजन केले जाईल. तर, फ्रान्स, जर्मनी आणि नॉर्वे या पुरुषांच्या पात्रता स्पर्धेचे यजमानपद कायम राखतील. पुढील वर्षी १२ ते १४ मार्च दरम्यान या स्पर्धेचे आयोजन केले जाईल.