भुवनेश्वर FIFA World Cup qualifiers : फिफा विश्वचषक २०२६ च्या दुसऱ्या फेरीच्या पात्रता फेरीतील दुसऱ्या सामन्यात मंगळवारी (२१ नोव्हेंबर) आशियाई चॅम्पियन कतारनं भारताचा ३-० असा पराभव केला.
कतारनं वर्चस्व कायम राखलं : 'अ' गटातील या लढतीत भारतीय संघानं कतारला टक्कर देण्याचा प्रयत्न केला. मात्र कलिंगा स्टेडियमवर पाहुण्या संघानं संपूर्ण ९० मिनिटे आपलं वर्चस्व कायम राखलं. संघानं काही संधी गमावल्या नसत्या तर त्यांच्या विजयाचे अंतर मोठं झालं असतं. कतारतर्फे मुस्तफा तारेक मशाल (४ मिनिट), अल्मेओज अली (४७ मिनिट) आणि युसूफ अदुरिसग (८६ मिनिट) यांनी गोल केले.
भारताला आणखी संधी आहे : पात्रता फेरीच्या दुसऱ्या फेरीच्या पहिल्या सामन्यात १६ नोव्हेंबर रोजी कुवेतचा १-० असा पराभव करणाऱ्या भारतीय संघाला गटात दुसरं स्थान मिळवून पुढील फेरीसाठी पात्र ठरण्याची संधी आहे. भारतीय संघ एकदाही फिफा विश्वचषक पात्रता फेरीच्या तिसऱ्या फेरीपर्यंत पोहोचू शकलेला नाही. म्हणजेच यावेळी जर तो या विश्वचषकात पोहोचला तर तो एक ऐतिहासिक क्षण असेल.
फिफा विश्वचषक पात्रता फेरी : भारतीय संघाला फिफा विश्वचषक 2026 च्या पात्रता फेरीच्या दुसऱ्या फेरीत अ गटात स्थान देण्यात आलं आहं. अ गटात कतारशिवाय कुवेत आणि अफगाणिस्तानचे संघ आहेत. भारतीय संघानं पहिल्या सामन्यात कुवेतचा 1-0 असा पराभव केला होता. आता भारतीय संघाला या गटातील आपला पुढचा सामना पुढील वर्षी 31 मार्च रोजी अफगाणिस्तानविरुद्ध खेळायचा आहे. याशिवाय गटातील उर्वरित तीन संघांविरुद्ध पुन्हा एकदा आणखी १-१ सामने खेळावे लागतील. त्यानंतर गटाची रँक तयार केली जाईल. सर्व सामने संपल्यानंतर, या गटातील टॉप-2 रँक असलेले संघ FIFA विश्वचषक पात्रता फेरीच्या तिसऱ्या फेरीसह 2027 एफसी आशियाई चषकासाठी त्यांचे स्थान निश्चित करतील.
हेही वाचा :
- क्रिकेट विश्वचषकात चाहत्यांनी मोडला रेकॉर्ड, जाणून घ्या किती लोकांनी स्टेडियममध्ये सामना पाहिला