महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Deepak Chahar on Malaysia Airlines : दीपक चाहरचे मलेशिया एअरलाईन्सवर गंभीर आरोप; सामान हरवले तथा भोजन न दिल्याचा केला दावा

दीपक चहर यांनी मलेशिया एअरलाइन्सवर त्यांचे सामान हरवल्याचा आणि जेवण न दिल्याचा आरोप ( Deepak Chahar has Accused Malaysia Airlines ) केला आहे. न्यूझीलंडहून ढाक्याला जात असताना मलेशियन एअरलाइन्सने त्याचे सामान हरवल्याचा चहर यांनी दावा केला आहे. चहर ( Indian fast bowler Deepak Chahar ) रविवारपासून बांगलादेशविरुद्ध सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात सामील होण्यासाठी न्यूझीलंडहून बांगलादेशला रवाना झाले आहेत.

Deepak Chahar on Malaysia Airlines
दीपक चाहरचे मलेशिया एअरलाईन्सवर गंभीर आरोप

By

Published : Dec 3, 2022, 8:28 PM IST

मीरपूर : भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहरने ( Indian fast bowler Deepak Chahar ) मलेशियन एअरलाइन्सवर गंभीर आरोप ( Deepak Chahar has Accused Malaysia Airlines ) केले आहेत. न्यूझीलंडहून ढाक्याला जात असताना ( Malaysia Airlines losing Chahar Luggage and Not Giving Him Food ) मलेशियन एअरलाइन्सने त्याचे सामान हरवल्याचा चहर यांनी दावा केला आहे. बिझनेस क्लासमध्ये प्रवास करूनही त्यांना जेवण दिले जात नसल्याचे त्यांनी सांगितले. चहर रविवारपासून बांगलादेशविरुद्ध सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात सामील होण्यासाठी न्यूझीलंडहून बांगलादेशला रवाना झाले आहेत.

चहरने सराव सत्रापूर्वी ट्विट केले की, मलेशियन एअरलाइन्सने प्रवास करणे हा खूप वाईट अनुभव होता. प्रथम त्यांनी आमची फ्लाइट बदलली आणि आम्हाला त्याबद्दल माहितीही दिली नाही. मग बिझनेस क्लासमध्ये जेवणही दिले जात नव्हते. आता आम्ही गेल्या 24 तासांपासून आमच्या सामानाची वाट पाहत आहोत तर आम्हाला उद्या सामना खेळायचा आहे. न्यूझीलंडमधील एकदिवसीय मालिका संपल्यानंतर चहर, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, शिखर धवन, शुभमन गिल आणि वॉशिंग्टन सुंदर हे क्राइस्टचर्चहून क्वालालंपूरमार्गे ढाका येथे पोहोचले.

सूर्यकुमार यादव (विश्रांतीमुळे) आणि उमरान मलिक यांनी थेट भारत गाठला. दुखापतग्रस्त मोहम्मद शमीच्या जागी वनडे संघात समावेश करण्यात आल्यामुळे मलिकला आता बांगलादेशचा दौरा करावा लागणार आहे. मलेशिया एअरलाइन्सने चहरला तक्रार दाखल करण्यासाठी लिंक पाठवली पण ती लिंक उघडत नसल्याचे क्रिकेटपटूंचे म्हणणे आहे. मलेशिया एअरलाइन्सने ट्विटरवर उत्तर दिले की ऑपरेशनल, हवामान आणि तांत्रिक कारणांमुळे असे होऊ शकते. गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.

ABOUT THE AUTHOR

...view details