बर्मिंगहॅम: 22 व्या राष्ट्रकुल क्रीडा ( CWG 2022 ) स्पर्धेत भारतीय संघाची दमदार कामगिरी कायम आहे. 2022 ची राष्ट्रकुल स्पर्धा 8 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. गुरुवारी भारतीय संघाच्या खात्यात एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक आले. पदकतालिकेत भारत 20 पदकांसह सातव्या स्थानावर आहे. अशा स्थितीत आठव्या दिवशी ( cwg 2022 indias program day 8 ) भारताची नजर पीव्ही सिंधू आणि बजरंग पुनिया यांच्यावर असेल.
शुक्रवारी (5 ऑगस्ट) होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेचे भारताचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. (भारतीय वेळेनुसार)
अॅथलेटिक्स आणि पॅरा अॅथलेटिक्स:
महिलांच्या 100 मीटर अडथळा शर्यत: फेरी 1 - हीट 2: ज्योती याराजी - दुपारी 3.06
महिलांची लांब उडी पात्रता फेरी: अ गट: अंसी एडापल्ली - 4.10 वा.
महिला 200 मीटर उपांत्य फेरी 2: हिमा दास - दुपारी 12.53 वा.
पुरुषांची 4x400m रिले फेरी 1: सायंकाळी 4.19 वा.
बॅडमिंटन:
महिला दुहेरी पूर्व उपांत्यपूर्व फेरी: त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद - दुपारी 4.10वा.
पुरुष दुहेरी पूर्व उपांत्यपूर्व फेरी: सात्विकसाईराज रँकिरेड्डी आणि चिराग शेट्टी - दुपारी 12.00 वा.
महिला एकेरी पूर्व उपांत्यपूर्व फेरी: पीव्ही सिंधू - संध्याकाळी 6.10 वा
महिला एकेरी प्री क्वार्टर फायनल: अकारशी कश्यप - रात्री 11.20 वा.
पुरुष एकेरी पूर्व उपांत्यपूर्व फेरी: लक्ष्य सेन - 11.20 तास
लॉन बॉल्स:
महिला जोडी उपांत्यपूर्व फेरी: भारत विरुद्ध इंग्लंड - दुपारी 1 स्क्वॉश:
पुरुष दुहेरी उपउपांत्यपूर्व फेरी: वेलावन सेंथिलकुमार आणि अभय सिंग - रात्री 11.15 वा.