महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

बास्केटबॉलपटू आणि 'हॉल ऑफ फेम'चे मानकरी केसी जोन्स कालवश

सर्वात यशस्वी खेळाडू आणि प्रशिक्षकांपैकी एक असलेल्या जोन्स यांनी आपल्या कारकिर्दीत सेल्टिक्समवेत ११ चॅम्पियनशिप पटकावल्या आहेत. यापैकी आठ त्यांनी खेळाडू आणि तीन चॅम्पियनशिप प्रशिक्षक म्हणून नावावर केल्या आहेत.

By

Published : Dec 27, 2020, 9:57 AM IST

Basketball Hall of Fame kc Jones dies at age 88
बास्केटबॉलपटू आणि 'हॉल ऑफ फेम'चे मानकरी केसी जोन्स कालवश

बोस्टन -बास्केटबॉलपटू आणि 'हॉल ऑफ फेम'चे मानकरी केसी जोन्स यांचे निधन झाले आहे. ते ८८ वर्षांचे होते. बर्‍याच वर्षांपासून त्यांना अल्झायमर आजाराने ग्रासले होते.

सर्वात यशस्वी खेळाडू आणि प्रशिक्षकांपैकी एक असलेल्या जोन्स यांनी आपल्या कारकिर्दीत सेल्टिक्समवेत ११ चॅम्पियनशिप पटकावल्या आहेत. यापैकी आठ त्यांनी खेळाडू आणि तीन चॅम्पियनशिप प्रशिक्षक म्हणून नावावर केल्या आहेत.

हेही वाचा -''....नाहीतर कायदेशीर कारवाई होईल'', माजी क्रिकेटपटू बिशनसिंग बेदींची डीडीसीएला इशारा

सेल्टिक्सचे महान खेळाडू लॅरी बर्ड म्हणाले, की मी भेटलेल्या सर्वांपैकी केसी सर्वात हुशार होता. लोकांना चांगले वाटावे म्हणून तो काहीही करु शकत होता. त्याच्याबरोबर खेळायला मिळणे हा मी माझा सन्मान समजतो. ९ नोव्हेंबर रोजी सेल्टिक्सचे माजी खेळाडू टोनी हेन्सन यांचे निधन झाले.

ABOUT THE AUTHOR

...view details