मुंबई:भारतीय महिला फुटबॉल संघाच्या दोन खेळाडू एएफसी एशियाई कपच्या आगोदर बुधवारी कोविड-19 चाचणीत पॉझिटिव आढळून आल्या आहेत. त्यांना आयोजकांनी आयसोलेशनमध्ये ठेवले आहे.
अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (All India Football Federation) ट्वीट केले की, एएफसी महिला एशियाई कप भारत 2022 साठीच्या भारतीय सीनियर राष्ट्रीय टीमच्या दोन सदस्यांचा कोविड-19 चाचणी पॉझिटिव आली आहे. त्यांना आता वैद्यकीय सेवेसाठी आयसोलेशनमध्ये ठेवले आहे.
महासंघाने इतर ट्विट मध्ये लिहले, एआईएफएफ आपल्या खेळाडूंच्या आरोग्यला आणि सुरक्षेला प्राधान्य देत आहे आणि एएफसी (Asian Football Confederation) द्वारा जारी जरूरी आरोग्याच्या नियमांचे पालन करत आहे.
एआईएफएफच्या जवळच्या एका सूत्राने सांगितले की, या दोन पैकी एका खेळाडूला इरान विरुद्धच्या सुरुवातीच्या सामन्यात अंतिम अकरात खेळणार होती. भारत आपल्या अभियानाची सुरुवात इरान विरुद्ध नवी मुंबई मधील डीवाय पाटील स्टेडियम येथे करणार आहे.
ही स्पर्धा सर्व संघांसाठी खुप महत्वाची आहे. कारण टॉप पाच संघ 2023 च्या फिफा महिला विश्वचषक (FIFA Women World Cup) मध्ये आपली जागा बनवतील. भारताला चीन, चीनी ताइपे आणि इराण सोबत ए गटात ठेवले आहे.