वॉशिंग्टन : आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीने ( International Paralympic Committee ) सोमवारी सांगितले की, या आठवड्याच्या शेवटी सुरू होणाऱ्या हिवाळी पॅरालिम्पिक खेळांसाठी युक्रेन पॅरालिम्पिक संघातील ( Ukraine Paralympic Team ) 20 खेळाडूंपैकी एकही खेळाडू बीजिंगला पोहोचला नाही.
Winter Paralympic Games : युक्रेनचे 20 पॅरालिम्पियन अद्याप चीनमध्ये पोहोचलेले नाहीत - हिवाळी पॅरालिम्पिक खेळ
आयपीसीने सोमवारी सांगितले की, या आठवड्याच्या शेवटी सुरू होणाऱ्या हिवाळी पॅरालिम्पिक खेळांसाठी ( Winter Paralympic Games ) युक्रेन पॅरालिम्पिक संघातील 20 खेळाडूंपैकी एकही खेळाडू बिजिंगला पोहोचलेला नाही.

आयपीसीचे प्रवक्ता क्रेग स्पेंसने ( IPC spokesman Craig Spence ) एपीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, त्यांना आशा आहे की खेळाडू शुक्रवारी होणाऱ्या उद्घाटन समारंभासाठी चीनला पोहोचतील. सुरक्षेच्या कारणास्तव आणि रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे, आता खेळाडूंनी ते सध्या कुठे आहेत. हे सांगण्यास नकार दिला आहे.
स्पेन्स म्हणाले, "आम्ही युक्रेनशी खेळांमध्ये प्रतिनिधित्व करण्याबाबत सतत बोलत आहोत आणि त्यांना येथे आणण्यासाठी आम्ही पडद्यामागे कठोर परिश्रम घेत आहोत. स्पेन्स म्हणाले की युक्रेनची राजधानी कीव येथून कोणतीही उड्डाणे नाहीत. एवढेच नव्हे तर पॅरालिम्पिक आणि नुकत्याच पार पडलेल्या ऑलिम्पिकसाठी चीनमध्ये येण्यासाठी काही निवडक विमानतळांवरून उड्डाणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.