भुवनेश्वर -हॉकी ऑलिम्पिक पात्रता संघाच्या दुसर्या सामन्यात अमेरिकेकडून पराभव झाल्यानंतरही भारतीय महिला संघाला पुढील वर्षी टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिकचे तिकीट मिळाले आहे. शनिवारी खेळल्या गेलेल्या ऑलिम्पिक पात्रतेच्या दुसऱ्या सामन्यात अमेरिकेने भारताला 4-1 ने मात दिली. मात्र सरस गोलफरकाच्या आधारावर भारतीय महिला संघ अमेरिकेवर मात करत टोकिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे.
हेही वाचा -'निवड समितीच्या सदस्याला मी विराटच्या पत्नीची हुजरेगिरी करताना पाहिलयं'
पात्रता स्पर्धेत झालेल्या पहिल्या लढतीत भारताने अमेरिकेला 5-1 अशा मोठ्या फरकाने पराभूत केले होते. मात्र परतीच्या लढतीत भारताला 1-4 असा पराभव पत्करावा लागला. 2016 मध्ये 36 वर्षांनंतर भारतीय महिला संघ रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला होता. त्यानंतर आता या संघाने टोकिओ ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवली आहे.
महिलांच्या सामन्यानंतर, भारताच्या पुरूष संघानेही जबरदस्त खेळ करत ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले आहे. पुरूष संघाने रूसल सलग दुसऱ्या सामन्यात 7-1 (एकूण 11-3) अशा गोलफरकाने हरवत ऑलिम्पिकमधील प्रवेश निश्चित केला. 23 व्या आणि 29 व्या मिनिटाला आकाशदीप सिंहने तर रुपिंदर पाल सिंह याने 48 व्या आणि 59व्या मिनिटाला गोल केला. तर ललित उपाध्याय याने 17 व्या मिनिटाला, नीलकांता शर्माने ४७ व्या मिनिटाला, तसंच अमित रोहिदास याने एक गोल केला.