नवी दिल्ली - हॉकी इंडियाने सोमवारी भारतीय पुरुष हॉकी संघाच्या नव्या मुख्य प्रशिक्षकाची घोषणा केली. भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि प्रशिक्षक ग्राहम रीड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू ग्राहम रीड यांची भारतीय पुरुष हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड
ग्राहम रीड लवकरच बेंगळुरूच्या भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) कॅम्पमध्ये भारतीय संघासोबत जोडले जाणार आबेत
ग्राहम रीड
54 वर्षीय रीड लवकरच बेंगळुरूच्या भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) कॅम्पमध्ये भारतीय संघासोबत जोडले जाणार आहेत. या शिबिरासाठी एकुण 60 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
रीड हे ऑस्ट्रेलियाचे एक अनुभवी खेळाडू आहेत. ते 1992 च्या बार्सिलोना ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाचा एक महत्वाचा भाग होते. याव्यतिरिक्त, 1984, 1985, 1989 आणि 1990 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाचेही ते सदस्य होते.