महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

रोनाल्डो ठरला १००० सामने खेळणारा जगातील पहिला फुटबॉलपटू

जुव्हेंटसने एसपीएएल संघाचा २-१ असा पराभव केला. या विजयासह ख्रिस्तियानो रोनाल्डो १००० सामने खेळणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे.

By

Published : Feb 23, 2020, 4:47 PM IST

Updated : Feb 23, 2020, 7:11 PM IST

Ronaldo become world first player to play 1000 official matches
रोनाल्डो ठरला १००० सामने खेळणारा जगातील पहिला फुटबॉलपटू

नवी दिल्ली - इटलीची फुटबॉल लीग सेरी-ए मध्ये शनिवारी रात्री जुव्हेंटसने एसपीएएल संघाचा २-१ असा पराभव केला. या विजयासह ख्रिस्तियानो रोनाल्डो १००० सामने खेळणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. या सामन्यात त्याने जुव्हेंटसकडून ३९ व्या मिनिटाला पहिला गोल केला. यासह, सेरी-एमध्ये सलग सामन्यात ११ गोल नोंदवणारा तो तिसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी अर्जेंटिनाच्या गॅब्रिएल बतिस्तुता आणि इटलीच्या फॅबिओ क्वाग्लिरेला यांनी ही कामगिरी केली होती.

हेही वाचा -काय सांगता!...८३ वर्षाच्या वेटलिफ्टरवर डोपिंगप्रकरणी बंदी

रोनाल्डो व्यतिरिक्त आरोन रामसेने ६० व्या मिनिटाला सामन्यात आणखी एक गोल केला. एंड्री पेटाग्नने एसपीएएलसाठी एकमेव गोल ६९ व्या मिनिटाला केला. जुव्हेंटसचा हा सलग दुसरा विजय आहे. यापूर्वी १६ फेब्रुवारी रोजी जुव्हेंटसकडून ब्रेस्सियाचा २-० असा पराभव झाला होता.

सोशल मीडिया अ‌ॅप इन्स्टाग्रामवरही पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू रोनाल्डो हिट ठरला आहे. या अ‌ॅपवर रोनाल्डोचे २०० मिलियन फॉलोअर्स झाले असून अशी कामगिरी करणारा तो पहिला व्यक्ती ठरला आहे. 'पाच वेळा बॅलन डी ऑरचा विजेता असलेल्या रोनाल्डोला इन्स्टाग्रामवरील प्रत्येक प्रायोजित पोस्टला ९ लाख युरो मिळतात', असे एका इन्स्टाग्राम मार्केटिंग कंपनीने अलीकडे सांगितले होते.

Last Updated : Feb 23, 2020, 7:11 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details