नवी दिल्ली -सर्गियो रामोसच्या गोलमुळे रिअल माद्रिदने एथलेटिक बिलबाओवर 1-0 असा विजय मिळवला. रिअल माद्रिदचा संघ तीन वर्षांत प्रथमच ला लीगाचे जेतेपद मिळवण्याच्या जवळ पोहोचला आहे.
कोरोना व्हायरसमुळे सर्व लीग पुढे ढकलण्यात आल्या होत्या. लीगच्या पुनरागमनानंतर रामोसचा हा पाचवा गोल आहे. सामन्याच्या 73 व्या मिनिटाला पेनल्टीवर रामोरसने हा गोल नोंदवत संघाला सलग सातवा विजय मिळवून दिला.